देवठाण तलाठी कार्यालयास टाळे ठोकण्याचा इशारा

अकोले प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील देवठाण तलाठी कार्यालय सातत्याने बंद राहत आहे तलाठ्याच्या या मनमानी कारभाराच्या निषेधार्थ देवठाणच्या तलाठी कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे याबाबत शेतकऱ्यांनी निवेदन दिले आहे यात सुधारणांना न झाल्यास तलाठी कार्यालयाला टाळे ठोकण्याचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला आहे
गेल्या 6 महिन्यापासून ,तलाठी कार्यालय नेहमी बंद असते,त्यामुळे विद्यार्थी वर्ग,शेतकरी वर्ग यांना दाखले व उतारे मिळण्यास विलंब होतो तलाठी बाळकृष्ण सावळे, यांनी निवेदन स्वीकारले
कार्यालयाची शासकीय वेळ सकाळी 10 ते6 आहे या वेळेत नक्कीच कार्यालय उघडे राहील बरेच वेळा मीटिंग,क्षेत्रीय भेटी असतात त्यामुळे बाहेर जावे लागते
तलाठी यांना मीटिंग ,क्षेत्रीय भेटी निमित्त बाहेर गावी जायचे असेल।तर,सकाळी ते स्वतः 10 ते12 ह्या वेळेत कार्यालयात थांबून,शेतकरी बांधव ह्यांचे उतारे देऊनच जाणार व कोतवाल हे कार्यालयात थांबणार आहे तलाठी व कोतवाल ह्या दोघांनाही काम असेल तर, त्यावेळी सूचना फलकांवर लिहून सूचना दिल्या जाईल जेणेकरून कोणत्याही शेतकरी बांधवांची अडचण होणार नाही असे यावेळी सांगण्यात आले
अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुधीर शेळके यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले यावेळी सुहास शेठ कर्डीले (माजी सभापती,पंचायत समिती,अकोले) जालिंदर बोडके,,महेश शेळके,परशराम शेळके,तुकाराम पाटोळे, दिनेश बोडके,महेश सोनवणे , दामु दादा शेळके,बाबू दराडे,,अशोक सोनवणे,आदी शेतकरी बांधव उपस्थित होते
तलाठी यांनी कामकाजात सुधारना करण्याबाबत निवेदन दिले, 8 दिवसात सुधारणा झाली नाही तर
तलाठी कार्यालयाला कुलूप लावून आंदोलन करण्यात येईल ,असा इशारा दिला।