तरुणांनी क्रांतीकारक राघोजी भांगरे यांच्या विचारांचा आदर्श घ्यावा- मधूकरराव पिचड

अकोले प्रतिनिधी
आद्य क्रांतीकारक राघोजी भांगरे यांच्या विचारांचा आदर्श तरुणांनी घ्यावा असे प्रतिपादन माजी आदिवासी विकास मंत्री मधुकरराव पिचड यांनी केले
अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद, नवी दिल्ली मुंबई विभाग शाखा आयोजित आघ क्रांतीवर राघोजी भांगरे यांच्या १७६ व्या स्मृती दिनी दि. २ मे २०२४ रोजी ठाणे मध्यवर्ती कारागृह येथे नवीन स्मारक उदघाटन व लोकार्पण सोहळा, प्रसंगी ते बोलत होते
डॉ गोविंद गारे यांचे सोबत ५० वर्षे सतत लढा देऊन राघोजी भांगरे चे स्मारक ठाणे सेंट्रल जेल, कल्याण सेंट्रल जेल , देवगाव (अकोले) येथे स्मारक निर्माण केल्याचा मला अभिमान असल्याचं मत मधुकरराव पिचड यांनी व्यक्त केले

आदिवासी महादेव कोळी समाजातील आद्य क्रांतीवीर राघोजी भांगरे (भांगरा) यांनी स्वातंत्र्याच्या लढयासाठी व गोरगरीब जनतेला इंग्रज व सावकारांच्या अन्यायापासून, त्यांच्या गुलामीतून सुटका करण्यासाठी अनेक आंदोलने केली, अनेक लढे दिले, स्वांत्र्याच्या इतिहासाची पाने पुन्हा पुन्हा चाळली तर लक्षात येते की, आदिवासी समाजातील क्रांतीवीरांचा प्रथम उल्लेखाशिवाय स्वातंत्र्य लढयाचा इतिहास लिहिला जाऊ शकणार नाही. या आद्य क्रांतीवीर राघोजी भांगरे यांना २ मे १८४८ रोजी ठाणे मध्यवर्ती कारागृहात इंग्रजांनी फाशी दिली
यावेळी मुंबई विभाग अध्यक्ष रामनाथ भोजने यांनी स्मारकासाठी जेल प्रशासनाला वेळो वेळी पत्रव्यवहार केल्या बद्दल माजी मंत्री मधुकरराव पिचड यांचे आभार व्यक्त केले
नवीन स्मरकामध्ये राघोजी भांगरे यांचा जीवन पट व शिलालेख व तैल चित्र ऐतिहासिक लढे ,याची माहिती या स्मरकामध्ये नवीन पुढीला प्रेरणा मिळेल असे श्रीं भोजने म्हणाले
यावेळी विधानसभा उपाध्यक्ष ना.श्री. नरहारी झिरवळ ठाण्याचे आमदार श्री. निरंजन डावखरे ,आयुक्त ठाणे म.न.पा श्री. सौरभ राव , श्री डॉ. सुपे (पुणे) अध्यक्षा ठाणे मध्यवर्ती कारागृह अध्यक्षा राणी भोसले आमदार संजय केळकर गटनेता ठाणे म.न.पा.श्री. मनोहर डुंबरे
माजी आमदार वैभवराव पिचड
माजी नगरसेवक) श्री. दत्तात्रय भुयाळ
मुंबई विभाग अध्यक्ष रामनाथ भोजणे, आदिवासी सेवक डॉ.व्ही.व्ही. पोपेरे सल्लागार लक्ष्मण साबळे,नविमुंबई अध्यक्ष
राम चव्हाण, आदिवासी सेवक मंगलदास भवारी युवक अध्यक्ष लक्कीभाऊ जाधव, पुणे अध्यक्ष गोविंद साबळे, दत्तात्रेय सुपे,
सुनिल भांगरे, रोहिदास साबळे चेतन मेमाने, पांडूरंग झांबाडे, नरेश रोज, गणेश भांडकोळी, रामदास हरवटे, जयश्रीताई इनामदार, शाहीर ठोंगीरे,मंजुळा साबळे रोहि दास साबळे,जयवंत देशमुख
महाराष्ट्र राज्य सहयाद्री सेवा संघ (मुंबई), गोंडवाना मित्र मंडळ मुंबई, बारली कातकरी सेवा संघ सर्व आदिवासी सामाजिक संघटना, समाज बांधव कार्यकर्ते मोठया प्रमाणावर उपस्थित होते सूत्र संचालन रामनाथ भोजने यांनींकेले तर लक्ष्म ण साबळे यांनी आभार मानले