इतर
टाकळी ढोकेश्वर येथे अवैध वाळू चा डपंर पकडला!

दत्ता ठुबे/ पारनेर प्रतिनिधी
पारनेर तालुक्यात टाकळी ढोकेश्वर पोलिसांनी अवैद्य वाळू वाहतूक करणारा डंपर पकडला.
आज सकाळी सात वाजता ही कारवाई केली. अवैध वाळू वाहतुकी विरुद्ध पोलिसांच्या या कारवाईने पुन्हा एकदा अवैध वाळू वाहतूकदारांचे धाबे दणाणले आहे. टाकळी ढोकेश्वर पोलिसात गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू केली आहे. MH 02 FG 9813 असा या डपंर चा नंबर आहे. उल्हास दरेकर ,रा. देसवडे ता. पारनेर यांच्या मालकीचा असून चालक विशाल बाबाजी तळेकर (रा.वासुंदे, पारनेर )आहे . पारनेर पोलिस स्टेशन चे पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांच्या मार्गदर्शनाखाली टाकळी ढोकेश्वर दुरक्षेत्राचे सहायक पोलिस निरीक्षक श्री. ठाकूर यांच्या पथकाने ही कारवाई केली .