सुरक्षित गुंतवणुकीतील धोके…” या विषयावर नाशिकला अर्थतज्ञ अॅड. कांतिलाल तातेड यांचे व्याख्यान

नाशिक दि ०९
रोटरी क्लब आॅफ नाशिक तर्फे रोटरी हाॅल, गंजमाळ येथे मंगळवार दिनांक 12 डिसेंबर 2023 रोजी संध्याकाळी ठीक 6 वाजता “सुरक्षित गुंतवणूकीतील धोके व ते टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी” या विषयावर अर्थतज्ज्ञ अॅड. कांतिलाल तातेड यांचे व्याख्यान होणार आहे. ठेवविम्याचे मर्यादित संरक्षण व बँकिंग क्षेत्रात होऊ घातलेले व्यापक बदल यामुळे बँकेतील ठेवी मोठ्या प्रमाणात असुरक्षित होत आहेत. वाढती महागाई व घटते मुद्दल त्यातच प्राप्तिकरामध्ये करण्यात आलेले व नजीकच्या काळात होऊ घातलेले संभाव्य घातक बदल ह्यापासून आपल्या बचतीचे संरक्षण करण्याचे आव्हान प्रत्येक गुंतवणूकदारापुढे आहे. या संदर्भात बँकेतील ठेवी तसेच अत्यंत लोकप्रिय अशा अल्पबचत योजनांच्या बाबतीत गुंतवणूकदारांनी गुंतवणूक करतांना कोणती काळजी घ्यावी, याचे उदाहरणांसह विश्लेषण व मार्गदर्शन अॅड कांतिलाल तातेड करणार आहेत.
सदर कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून त्यास सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन रोटरी क्लब ऑफ नाशिकचे अध्यक्ष मंगेश अपशंकर व सेक्रेटरी गौरव सामनेरकर यांनी केले आहे.