इतर

पिंपळगाव नाकविंदा येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन.

अकोले/प्रतिनिधी-

श्रीक्षेत्र पिंपळगाव नाकविंदा(ता.अकोले) येथे शनिवार १३/०४/२०२४ ते शनिवार २०/०४/२०२४ पर्यंत अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले आहे.

या कालावधीत पहाटे ४ते ६ वा.काकडा भजन,सकाळी ११ते १२वा. गाथा भजन, ३ते ४.३०वा.नियमांचे भजन,सायंकाळी ६ते ७वा. हरिपाठ,रात्री ९ वा.हरिकिर्तन व नंतर हरिजागर आदि धार्मिक विधींचे आयोजन केले आहे.

शनिवार दि.१३/०४/२०२४ रोजी ह.भ.प.राजेंद्र महाराज नवले,रविवार दि.१४/०४/२०२४ रोजी ह.भ.प.मदन महाराज वर्पे,सोमवार दि.१५/०४/२०२४ रोजी अमोल महाराज भोत,मंगळवार दि.१६/०४/२०२४ रोजी योगेश महाराज वागे,बुधवार दि.१७/०४/२०२४ रोजी सकाळी रामनवमी निमित्त ह.भ.प.सुनिल महाराज मंगळापुरकर व रात्री ह.भ.प.देवराम महाराज गायकवाड,गुरूवार दि.१८/०४/२०२४ रोजी ह.भप.राजेंद्र महाराज सदगीर,शुक्रवार दि.१९/०४/२०२४ रोजी ह.भ.प.दत्ता महाराज भोर तसेच शनिवार दि. २०/०४/२०२४ रोजी सकाळी काल्याचे किर्तन ह.भ.प.दत्ता महाराज भोर यांचे होईल व नंतर महाप्रसाद होईल.

.परिसरातील सर्व भाविक भक्तांनी या आमृतमय संधीचा लाभ घ्यावा.असे आव्हान समस्त ग्रामस्थ व भजनी मंडळ पिंपळगाव नाकविंदा,आढळवाडी,सोंगाळवाडी, श्री.विठ्ठल देवस्थान ट्रस्ट,आजी,माजी,सरपंच,उपसरपंच

,सदस्य,पोलिस पाटील,तंटामुक्त समिती,तरूण मित्रमंडळ आदींनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button