इतर

आजचे पंचांग व राशिभविष्य दि.०९/०५/२०२४

🙏🙏 सुप्रभात 🙏🙏


🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- वैशाख १९ शके १९४६
दिनांक :- ०९/०५/२०२४,
वार :- बृहस्पतीवासरे(गुरुवार),
🌞सुर्योदय:- सकाळी ०५:५९,
🌞सुर्यास्त:- सांयकाळी ०६:५२,
शक :- १९४६
संवत्सर :- क्रोधी
अयन :- उत्तरायण
ऋतु :- वसंतऋतु
मास :- वैशाख
पक्ष :- शुक्लपक्ष
तिथी :- प्रतिपदा समाप्ति ०६:२२, व्दितीया २८:१८,
नक्षत्र :- कृत्तिका समाप्ति ११:५५,
योग :- शोभन समाप्ति १४:४१,
करण :- बालव समाप्ति १७:१६,
चंद्र राशि :- वृषभ,
रविराशि – नक्षत्र :- मेष – भरणी,
गुरुराशि :- वृषभ,
शुक्रराशि :- मेष,
राशिप्रवेश :- राशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- क्षयतिथी दिवस,

✿राहूकाळ:- दुपारी ०२:०२ ते ०३:३९ पर्यंत,

लाभदायक वेळा
शुभ मुहूर्त — सकाळी ०५:५९ ते ०७:३६ पर्यंत,
लाभ मुहूर्त — दुपारी १२:२६ ते ०२:०२ पर्यंत,
अमृत मुहूर्त — दुपारी ०२:०२ ते ०३:३९ पर्यंत,
शुभ मुहूर्त — संध्या. ०५:१६ ते ०६:५२ पर्यंत,

❀ दिन विशेष:
चंद्रदर्शन (२०:३६ प.), मु. ४५ समर्घ, यमघंट ११:५५ प.,
————–

🐾🐾🐾🐾🐾🐾🐾🐾🐾
आजचा दिवस सुखाचा जावो मन प्रसन्न राहो!!!!!
💐🌺🌼🌹🌾🍀🌻🌷🌸


🌏 दैनिक राशीभविष्य 🌏


राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- वैशाख १९ शके १९४६
दिनांक = ०९/०५/२०२४
वार = बृहस्पतीवासरे(गुरुवार)

मेष
अती विचार करू नका. मैत्रीचे संबंध जपावेत. जमिनीच्या कामात लाभ संभवतो. घरात तुमच्या मताला वजन प्राप्त होईल. मानसिक चंचलता जाणवेल.

वृषभ
सर्वांशी गोडीने वागाल. कामाचा व्याप लक्षात घ्यावा. अती श्रमामुळे थकवा जाणवेल. सगळ्यांचे लक्षपूर्वक करण्यात दमून जाल. मनातील इच्छा पूर्ण होईल.

मिथुन
कामात चालढकल करू नका. एकाच वेळी अनेक कामे अंगावर येऊन पडतील. वेळेचे महत्व लक्षात घ्या. क्षणिक आनंदाने हुरळून जाऊ नका. पैशाचा अपव्यय टाळावा.

कर्क
व्यावसायिक वाढीचे नियोजन आखाल. कामातून अपेक्षित लाभ मिळेल. नवीन लोकांशी संपर्क वाढेल. वैवाहिक सौख्य जपावे लागेल. छुप्या शत्रूंचा त्रास संभवतो.

सिंह
वैवाहिक सौख्याकडे अधिक लक्ष द्यावे. कामाचा आवाका वाढू शकतो. आळस झटकून टाकावा लागेल. कमिशन मधून मिळणारा फायदा लक्षात घ्यावा. कामाच्या ठिकाणी आपली पत जपावी.

कन्या
जोडीदाराचा प्रेमळ सहवास लाभेल. आपले संपर्क क्षेत्र वाढेल. चारचौघात कौतुकास पात्र व्हाल. वडीलधार्‍या व्यक्तींचा विरोध होण्याची शक्यता आहे. मानसिक ताण कमी करण्याचा प्रयत्न करावा.

तूळ
नातेवाईकांशी सलोखा जपता येईल. कामात समाधान मिळेल. कामाच्या ठिकाणी चांगले वातावरण राहील. अती उत्साह दर्शवू नका.

वृश्चिक
मित्रांशी मतभेदाची शक्यता आहे. करमणुकीची साधने शोधाल. प्रवासात किरकोळ अडचण येऊ शकते. मुलांच्या आनंदात रमून जाल.

धनू
घरगुती वातावरणात दिवस चांगला जाईल. मनाजोगी कामे करण्यात दिवस व्यतीत कराल. बाहेरील अन्नपदार्थ खाणे टाळावे. हातातील कामात यश येईल. कचेरीची कामे निघतील.

मकर
कौटुंबिक सौख्य जपाल. कामातून समाधान शोधण्याचा प्रयत्न करावा. तुमच्या विचारांचा आदर राखला जाईल. बोलतांना कोणी दुखावले जाणार नाही याची काळजी घ्यावी. शेअर्स, लॉटरी यांचा अती हव्यास नको.

कुंभ
धाडसाला वेगळे वळण लागणार नाही याची काळजी घ्या. आततायीपणे वागणे चुकीचे ठरेल. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. प्रवास काळजीपूर्वक करावा. शांतपणे विचार करण्याला प्राधान्य द्या.

मीन
मनाजोग्या वस्तु खरेदी कराल. भावंडांचे वागणे रूचणार नाही. उगाचच टिप्पणी करायला जाऊ नका. सामोपचाराचे धोरण ठेवा. संपूर्ण विचारांती निर्णय घ्यावा.

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button