खासदार विखे पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य नवीन काकणेवाडी शाळेस जेवणाचे डबे भेट

दत्ता ठुबे
पारनेर प्रतिनिधी –
अहमदनगर जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार डॉ.सुजयदादा विखे पा.यांच्या वाढदिवसाचे औचित्य व स्वतंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त इयत्ता 1 ली ते 4 थी पर्यंत 57 व अंगणवाडी केंद्रास 26 जेवणाचे डबे देण्यात आले.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे पारनेर जनसेवा कार्यालयाचे संपर्क प्रमुख शेळके सर, सोनवणे सर व अध्यक्षस्थानी मा.उपसरपंच निवृत्ती वाळुंज होते.मा.सरपंच गिताराम वाळुंज, व्हा.चेअरमन ज्ञानदेव वाळुंज, ग्रा.प.सदस्य जयवंत वाळुंज, संदीप वाळुंज,अर्जुन वाळुंज, विष्णू वाळुंज, रावसाहेब वाळुंज,नामदेव वाळुंज व ग्रामस्थ,तसेच सर्व शिक्षकवृंद व विद्यार्थी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे मनोगत मुख्याध्यापक बाळासाहेब खराबी व आभार प्रदर्शन शिक्षिका सौ. अलका खोडदे यांनी केले तसेच हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शिक्षिका सौ.ज्योती कर्डीले व सौ. वनिता सुंबे यांनी प्रयत्न केले.