ग्रामीण
अवकाळी पावसात अंगावर वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू!

राजूर प्रतिनिधी
- विजेच्या उन्हाळी पिकांचे नुकसान झाले.
कडकडासह वादळी वाऱ्यासह राजूर परिसरास शुक्रवारी अवकाळी पावसाने झोडपले.दरम्यान दुपारी वाजता राजूर येथील पंढरीनाथ जयवंत मुतडक (वय ६५) या शेतकऱ्याच्या अंगावर वीज पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.
शुक्रवारी दुपारी राजूर, जामगाव व परिसरातील गावात जोरदार पावसाच्या सरी कोसळण्यास सुरूवात झाली. शेतकऱ्यांची शेतातील व घरासमोरील कांदे झाकण्यासाठी एकच धावपळ
उडाली. वाऱ्याचा वेग प्रचंड असल्याने काही शेतकऱ्यांच्या कांद्याचे व इतर दरम्यान, दुपारी अडीचच्या सुमारास पंढरीनाथ मुतडक हे आपल्या राजूर येथील शेतात पाऊस उघडल्यानंतर गवत झाकत होते. याचवेळी अचानक विजेचा कडकडाट झाला आणि ही
वीज पंढरीनाथ यांच्यावर कोसळली. त्यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. यानंतर त्यांचे बंधू पोपट हे शेतात गेल्यानंतर त्यांनी हा प्रकार पाहिला
व नातेवाईकांना बोलवले. त्यांना दवाखान्यात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पंचनामा करून त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी
ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मयत मुतडक यांच्यामागे पत्नी, दोन मुले आणि तीन मुली असा परिवार आहे.