राशिभविष्य

आजचे पंचांग व राशिभविष्य दि.३०/०४/२०२४

🙏🙏 सुप्रभात 🙏🙏


🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- वैशाख १० शके १९४६
दिनांक :- ३०/०४/२०२४,
वार :- भौमवासरे(मंगळवार),
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:०४,
🌞सुर्यास्त:- सांयकाळी ०६:४९,
शक :- १९४६
संवत्सर :- क्रोधी
अयन :- उत्तरायण
ऋतु :- वसंतऋतु
मास :- चैत्र
पक्ष :- कृष्णपक्ष
तिथी :- षष्ठी समाप्ति ०७:०६, सप्तमी २९:४७,
नक्षत्र :- उत्तराषाढा समाप्ति २८:०९,
योग :- साध्य समाप्ति २२:२४,
करण :- विष्टि समाप्ति १८:२९,
चंद्र राशि :- धनु,(१०:३७नं. मकर),
रविराशि – नक्षत्र :- मेष – भरणी,
गुरुराशि :- मेष,
शुक्रराशि :- मेष,
राशिप्रवेश :- राशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- क्षयतिथि वर्ज्य दिवस,

✿राहूकाळ:- दुपारी ०३:३८ ते ०५:१४ पर्यंत,

लाभदायक वेळा
लाभ मुहूर्त — सकाळी १०:५१ ते १२:२६ पर्यंत,
अमृत मुहूर्त — दुपारी १२:२६ ते ०२:०२ पर्यंत,
शुभ मुहूर्त — दुपारी ०३:३८ ते ०५:१४ पर्यंत,

❀ दिन विशेष:
भद्रा ०७:०६ नं. १८:२९ प.,
————–


🐾🐾🐾🐾🐾🐾🐾🐾🐾

🌏 दैनिक राशीभविष्य 🌏


राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- वैशाख १० शके १९४६
दिनांक = ३०/०४/२०२४
वार = भौमवासरे(मंगळवार)

मेष
धार्मिक कामात सहभाग घ्याल. मदतीचा हात पुढे कराल. योग्य मार्गदर्शन कराल. कामाचे योग्य नियोजन करावे. अती श्रमामुळे थकवा जाणवेल.

वृषभ
वायफळ बडबड टाळावी. मानापमानाचे प्रसंग येऊ शकतात. परिस्थितीची जाणीव ठेवून वागावे. कामातील बादल लक्षात घ्या. कलेचा आस्वाद घ्याल.

मिथुन
जोडीदारा विषयी गैरसमज टाळावेत. भागीदारीत सतर्क राहावे. तब्येतीची हेळसांड करू नये. आपली संगत तपासून पहावी. एकाच वेळी भारंभार कामे अंगावर घेऊ नका.

कर्क
तरुण लोकांशी मैत्री कराल. दिवस खोडकरपणात घालवाल. सहकार्‍यांवर अवलंबून राहू नका. कामातून समाधान शोधावे. जोडीदाराच्या शांत स्वभावाने अचंबित व्हाल.

सिंह
वरिष्ठांच्या मर्जीचे पालन कराल. जोडीदाराचे वर्चस्व राहील. भागीदाराशी वाद वाढवू नका. अंगीभूत कलेचे कौतुक केले जाईल.

कन्या
मनाची द्विधावस्था जाणवेल. घरच्या कामाचा ताण जाणवेल. अपचनाचा त्रास जाणवेल. हातातील कामात यश येईल. छुप्या शत्रूंवर लक्ष ठेवावे.

तूळ
जोडीदाराचा हट्ट पुरवाल. जवळच्या प्रवासात सतर्क राहावे. अती अपेक्षा बाळगू नका. मानसिक ताणाला बळी पडू नका. मुलांचा विरोध समजून घ्यावा.

वृश्चिक
घरातील गोष्टींकडे अधिक लक्ष द्यावे. फारच आवश्यकता असेल तरच प्रवास करावा. कौटुंबिक वातावरण शांततेचे ठेवावे. पत्नीचा लाडिक हट्ट पुरवाल. घरातील कामे स्वखुशीने पार पाडाल.

धनू
आपल्याच मर्जीने कामाचा भार उचलाल. भावंडांच्या समस्या जाणून घ्याव्यात. कौटुंबिक सौख्य वाढेल. क्षुल्लक गोष्टींची चिंता करत बसू नका. उधारीचे व्यवहार शक्यतो टाळावेत.

मकर
मैत्रीतील आपुलकी वाढेल. फसवणुकीपासून सावध राहा. अनाठायी खर्च होऊ शकतो. मत्सराला बळी पडू नका. आर्थिक लाभाचा दिवस.

कुंभ
डोकेदुखीचा त्रास जाणवेल. वेळेचे योग्य नियोजन करावे. धाडसाने कामे हाती घ्याल. सारासार विचार करण्यावर भर द्यावा. अती घाई बरी नाही.

मीन
जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी. हातापायांच्या दुखण्याकडे दुर्लक्ष नको. कौटुंबिक खर्च आटोक्यात ठेवा. कर्तव्यात कसूर करू नका. हातून चांगले लिखाण होईल.

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button