रत्नागिरीच्या स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेला ब्ल्यू रीबीन पुरस्कार !

रत्नागिरी दि.१७ मे
३०० कोटी पर्यंतच्या ठेव विभागातील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार आज स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेला प्रदानकरण्यात आला.२०२३ साठीचा हा पुरस्कार बँकोचे मुख्य
संपादक अविनाश शिंत्रे – गुंडाळे यांनी स्वामी
स्वरूपानंद पतसंस्थेच्या रत्नागिरी कार्यालयात प्रत्यक्ष येऊन अॅड. दीपक पटवर्धन यांना ब्ल्यू रीबिन २०२३ ची ट्रॉफी प्रदान केली.
बँको आणि अविज पब्लिकेशनच्यावतीने प्रतिवर्षी बँको ब्ल्यू रीबन १ पुरस्कार प्रदान करण्यात येतात.
स्वरूपानंद पतसंस्थेला सातत्याने ८ वर्षे बँकोचा पुरस्कार प्राप्त होत आहे. विश्वासार्ह अर्थकारण, अचूक रेकॉर्ड-किपिंग, तंत्रज्ञानाचा वापर करत स्वामी स्वरूपानंद पतसंस्था सातत्याने आपले अर्थकारण करीत आहे.
संस्थेची संबंधित असलेल्या सभासदांची संख्या आता ४५ हजार पार गेली आहे. १७ शाखांच्या माध्यमातून सहकार क्षेत्रात सातत्यपूर्ण कामगिरी करणारी पतसंस्था म्हणून स्वामी स्वरूपानंद संस्थेची
ओळख आहे.
राज्य फेडरेशनचा दीपस्तंभ,राज्य शासनाचा मानाचा सहकार भूषण तसेच केंद्र शासनाच्या अंगीकृत राष्ट्रीय सहकारिता
निगमचा २०२३ च्या गुणवत्ता पुरस्काराने स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेला गौरवण्यात आले आहे. बँकोचा ब्ल्यु रीबन पुरस्कार स्विकारताना खूप आनंद होतो. हा पुरस्कार नवचेतना जागवणारा पुरस्कार आहे. ३५० कोटी ठेवींचा ठेव टप्पा खुणावत असताना प्राप्त झालेला हा पुरस्कार संस्थेसाठी अभिमानाची गोष्ट असल्याचे स्वामी
स्वरूपानंद पतसंस्थेचे अध्यक्ष अॅड. दीपक
पटवर्धन यांनी सांगितले.