साईसम्राट ताजने चे दहावीत(सिबीएसई पॅटर्न)घवघवीत यश!

अकोले -अकोले तालुक्यातील कोहणे येथे कार्यरत असलेले आदर्श ग्रामसेवक पुरस्कार प्राप्त ग्रामसेवक श्री.रवींद्र ताजने यांचे सुपुत्र चि. साईसम्राट ताजने याने इयत्ता दहावीत(सिबीएसई पॅटर्न)92.60% मिळवून सुयश मिळविले
.प्रवरा सेंट्रल पब्लिक स्कुल या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत त्याचे पहिली ते दहावी शिक्षण झाले असून त्या शाळेने त्याची प्रिफेक्ट म्हणून निवड केली होती.यावर्षी झालेल्या आंतर शालेय वत्कृत्व स्पर्धेतही तो प्रथम आला होता.त्याची मोठी बहिन कु.साक्षी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,सातारा येथे एम बी बी एस च्या तिसऱ्या वर्गात शिक्षण घेत आहे.तोच आदर्श ठेऊन साईसम्राट डॉक्टर होण्याचे स्वप्न बाळगून आतापासूच नीट परीक्षेची तयारी करीत आहे.या यशाबद्दल माजी मंत्री मधुकरराव पिचड,खासदार सदाशिव लोखंडे, आमदार श्री. किरण लहामटे,मा.आमदार वैभव पिचड,ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री.एकनाथ ढाकने यांनी अभिनंदन केले आहे.