सोलापुरात 10वी 12वी तील गुणवंतांचा होणार सन्मान!
विद्यार्थी युवकाला ‘पद्म-एकलव्य’
तर, युवतीला ‘पद्म-ज्योती’ पुरस्कार
सोलापूर : सोलापूर शहरात सामाजिक क्षेत्रात नवनवीन उपक्रम राबवण्यासाठी लौकीक असलेल्या श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशन आणि सोलापूरातील पद्मशाली फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापूरातील-पद्मशाली समाजातील इ. १० वी व १२ वीत ८० % पेक्षा जास्त गुण मिळवून यशस्वी झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा वह्या सोलापूरातील पद्मशाली फौंडेशन तर्फे देउन, गुणगौरव करण्यात येणार आहे. अशी माहिती पद्मशाली फौंडेशनचे सचिव अंबादास कुडक्याल यांनी दिले आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून लवकरच १० वी, १२ वीचे निकाल व गुणपत्रिका ऑनलाईन घोषित केले जाईल. सोलापूर शहरात राहणा-या विद्यार्थी, पालक, नातेवाईक किंवा इतरांनी, भद्रावती पेठ येथील श्री साई दरबार मंदिराच्या पाठीमागील ‘वर्षा रबर स्टँप’ येथे गुणपत्रिकेची सत्यप्रत (झेरॉक्स) (पालकांचे मोबाईल नंबर लिहणे आवश्यक आहे.) जमा करावीत. आणि सोलापूर बाहेर असलेल्यांनी ‘9021551431’ या भ्रमणध्वनीच्या व्हाटस्अपवर गुणपत्रिकेचे फोटो पाठवावेत. झेरॉक्स प्रत द्यायची अंतिम तारीख ५ जून संध्याकाळी ६ वाजेपर्यंत आहे. श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशन तर्फे १० वीत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या युवक आणि युवतीला अनुक्रमे ‘पद्म-एकलव्य’, ‘पद्म-ज्योती’ पुरस्कार देउन सन्मान करण्यात येईल. ‘प्राप्त झालेल्या गुणपत्रिकेनुसार निवड करुन पुरस्कार देउन सन्मान केले जाईल’. (याची नोंद घ्यावी.)
हा पुरस्कार पद्मशाली ज्ञाती संस्थेचे विश्वस्त श्रीधर व्यंकप्पा सुरा यांच्या वतीने दिले जाणार आहे.
तसेच सोलापूर जिल्ह्यात प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक आलेल्या पद्मशाली समाजातील तीन (३) विद्यार्थ्यांना सौ. वेणी विठ्ठल वंगा संचालिका असलेल्या ‘सारथी इंग्लिश स्पीकिंग क्लासेस’ तर्फे ३ महिना नि:शुल्क इंग्लिश स्पीकिंग (विनामूल्य) शिकवले जातील. विद्यार्थी व पालकांनी, जास्तीत जास्त संख्येने संपर्क साधावेत, असे आवाहन फौंडेशनचे संस्थापक ॲड. रामदास सब्बन आणि श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशनचे उपाध्यक्ष नागेश पासकंटी, श्रीनिवास कामूर्ती, नागेश सरगम, सल्लागार सुकुमार सिध्दम, दयानंद कोंडाबत्तीनी, लक्ष्मण दोंतूल, श्रीनिवास रच्चा, किशोर व्यंकटगिरी, श्रीनिवास पोटाबत्ती आदींनी केले आहे.
————————–
पुरस्कार देण्यामागचा उद्देश एवढाच की, विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारे अभ्यास करावे, त्यांना लहान वयात पुरस्कार मिळाल्याने प्रेरणा मिळेल. भविष्यात सुसंस्कृत होऊन त्यांचे भावी आयुष्य उज्ज्वल घडेल, अशी अपेक्षा. राज्यभरातून दहावीत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या युवक आणि युवतीला पुरस्कार देण्याचा हे दुसरे वर्ष आणि सोलापूरातील पद्मशाली समाजातील विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्याचे नववे वर्ष आहे. लवकरच कार्यक्रमाचे तारीख सोशल मिडीयावर कळवू तसेच राज्यातील कॅबिनेट मंत्री किंवा राज्यमंत्री यांना या कार्यक्रमाचे निमंत्रण देणार आहे, असेही फाउंडेशनचे संस्थापक गौरीशंकर कोंडा यांनी सांगितले आहे.
—————————