आजचे पंचांग व राशिभविष्य दि २२/१०/२०२४

: 🙏🙏 सुप्रभात 🙏🙏
🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- अश्विन ३० शके १९४६
दिनांक :- २२/१०/२०२४,
वार :- भौमवासरे(मंगळवार),
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:२६,
🌞सुर्यास्त:- सांयकाळी ०६:०१,
शक :- १९४६
संवत्सर :- क्रोधी
अयन :- दक्षिणायन
ऋतु :- हेमंतऋतु
मास :- अश्विन
पक्ष :- कृष्णपक्ष
तिथी :- षष्ठी समाप्ति २५:२९,
नक्षत्र :- आर्द्रा समाप्ति २९:३९,
योग :- परीघ समाप्ति ०८:४६,
करण :- गरज समाप्ति १३:५४,
चंद्र राशि :- मिथुन,
रविराशि – नक्षत्र :- तुला – चित्रा,
गुरुराशि :- वृषभ,
शुक्रराशि :- वृश्चिक,
राशिप्रवेश :- राशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- चांगला दिवस,
✿राहूकाळ:- दुपारी ०३:०७ ते ०४:३४ पर्यंत,
♦ लाभदायक वेळा
लाभ मुहूर्त — सकाळी १०:४७ ते १२:१३ पर्यंत,
अमृत मुहूर्त — दुपारी १२:१३ ते ०१:४० पर्यंत,
शुभ मुहूर्त — दुपारी ०३:०७ ते ०४:३४ पर्यंत,
❀ दिन विशेष:-
वृश्चिकायन २७:४४, सौर हेमंतऋतु प्रारंभ, भद्रा २५:२९ नं., यमघंट २९:३९ प.,
————–
🌏🌏 दैनिक राशीभविष्य 🌏🌏
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- आश्विन ३० शके १९४६
दिनांक = २२/१०/२०२४
वार = भौमवासरे(मंगळवार)
मेष
विचार करून मगच बोलावे. रागावर नियंत्रण ठेवा. जोडीदाराशी उगाच वाद घालू नका. भागीदारीत सबुरीने वागावे. भावंडांचे प्रश्न सोडवाल.
वृषभ
दिवस मनासारखा घालवाल. जास्त विचार करत बसू नका. चारचौघात कौतुक होईल. तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका. अचानक धनलाभाची शक्यता.
मिथुन
वैचारिक गुंतागुंत वाढेल. एकाच गोष्टीवर ठाम राहावे. जोडीदाराची साथ उत्तम लाभेल. पित्त विकाराचा त्रास जाणवेल. क्षुल्लक कारणावरून चिडू नका.
कर्क
कामाची दगदग वाढेल. सतत गुंतून राहाल. कौटुंबिक वातावरण प्रसन्न ठेवा. सर्वांना आपलेसे करून घ्याल. क्षुल्लक मतभेदात अडकू नका.
सिंह
अधिकाराचा वापर करा. तुमच्याबाबत गैरसमज पसरू शकतो. कर्तुत्वाला चांगला वाव मिळेल. भावंडे तुमच्याविषयी तक्रार करू शकतात. स्वत:चा आब राखून वागाल.
कन्या
बोलताना सारासार विचार करून बोलावे. अति तिखट पदार्थ खाणे टाळावे. अपशब्द टाळण्याचा प्रयत्न करावा. हातात काही नवीन जोखमीची कामे येतील. भावंडांचे सहकार्य लाभेल.
तूळ
राग आवरावा. डोकेदुखीचा त्रास जाणवेल. कौटुंबिक जबाबदारीत वाढ होईल. काही जुने प्रश्न सामोरे येतील. घरगुती ताण आटोक्यात ठेवावा.
वृश्चिक
राजकारणी धोरण महागात पडू शकते. स्वत:चेच खरे कराल. मनासारखी विश्रांती मिळणार नाही. एकाच गोष्टीवर अडून राहू नका. कर्ज प्रकरणे वेळेवर हाताळा.
धनू
प्रत्येक गोष्टीकडे आनंदी नजरेने पहाल. सौंदर्यवादी दृष्टिकोन बाळगाल. आवडीचे पदार्थ चाखाल. कामे मनाजोगी पार पडतील. झोपेची तक्रार जाणवेल.
मकर
चिकाटी सोडून चालणार नाही. तब्येतीच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. मुलांकडे बारीक लक्ष ठेवावे. पैज जिंकता येईल. कामातील बदल जाणून घ्या.
कुंभ
उद्दीष्ट साध्य करण्यासाठी तयार रहा. जुनी कोर्टाची कामे निघू शकतात. मित्रांच्या सहवासात रमाल. आवडती वस्तु खरेदी कराल. वरिष्ठांची मर्जी सांभाळा.
मीन
ईश्वर भक्तीत अधिक वेळ घालवाल. शारीरिक कष्ट अधिक संभवतात. किरकोळ दुखापत होण्याची शक्यता. अति अपेक्षा बाळगू नका. प्रवासाचा योग संभवतो.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर