महालक्ष्मी विद्यालयाचा दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल ९३.६५%.

अकोले/प्रतिनिधी-
अकोले तालुक्यातील अगस्ती रूरल एज्युकेशन सोसायटी संचलित महालक्ष्मी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पिंपळगाव नाकविंदा या विद्यालयाचा इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल ९३.६५ % एवढा लागला असल्याची माहिती विदयालयाचे मुख्याध्यापक सुनील धुमाळ यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.
येथील महालक्ष्मी विद्यालयाचा कु.काळे अभिषेक विकास याने ९३.४०% गुण मिळून विद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला आहे, तर कुमारी काळे समीक्षा बाळकृष्ण हिने ८६.४०% गुण मिळवून द्वितीय क्रमांक मिळवला आहे.त्याचप्रमाने आढळ रोशनी नामदेव ८१.३०% गुण मिळवून तृतीय क्रमांक,वाळकुळे सचिन किसन याने ७७.२०% गुण मिळवून चतुर्थ क्रमांक मिळविला. तर वाघमारे अजय विजय यांने ७५.२०% गुण मिळवून पाचवा क्रमांक मिळविला आहे.
तसे पाहीले तर पिंपळगाव नाकविंदा हे अकोले तालुक्यातील दुर्गम डोंगराळ गाव असून संपूर्ण कुटूंब हे शेतीवरच आपली उपजिवीका करतात.सर्व मुल आपल्या आई वडीलांना शेतात कामाला मदत करून अभ्यास करत असतात. शेतकरी कुटूंबातील या मुलांना विद्यालयातील शिक्षणा पलीकडे इतर मार्गदर्शन नाही.तरीही शहरातील तासंनतास आभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांबरोबरीने येथील विद्यार्थी गुणवंत यादीत चमकनारे आहेत.दरवर्षाप्रमाणे याही वर्षी गुणवत्तेची परंपरा कायम ठेवली आहे.याचा सर्व शेतकरी वर्गासह गावकऱ्यांना सार्थ अभिमान आहे.
विद्यालयाच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अॅड.वसंतराव मनकर,सचिव मंगेशराव नवले,विश्वस्त महादेवराव पठारे, सरपंच लक्ष्मण सोंगाळ ,उपसरपंच मारुती पाटील काळे, स्थानिक कमिटीचे अध्यक्ष मारुती आभाळे, माजी उपसरपंच बबनराव आभाळे,भाऊसाहेब कासार,विनोद हांडे, मुख्याध्यापक सुनील धुमाळ, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामस्थ आदींनी अभिनंदन केले