पांडुरंग अभंग यांच्या उपस्थित अकोल्यात ओबीसी आरक्षणा बाबत बैठक

अकोले प्रतिनिधी
अकोल्यात ओबीसी आरक्षणा बाबत समता परिषदेची बैठक आयोजित केली आहे या बैठकीसाठी समता परिषदेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग उपस्थित राहणार आहेत
ओबीसी आरक्षण या विषयावर चर्चा करण्यासाठी दि.28/8/2022 रोजी दुपारी 4 वाजता शासकीय विश्रामगृह अकोले येथे बैठक आयोजित केली आहे. सदर प्रस॔गी समता परिषद राष्ट्रीय उपाध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग.समता परिषदेचे पद्मकांत
कुदळे,अंबादास गारूडकर,मच्छिंद्र गुलदगड, जिल्हाध्यक्ष प्रशांत शिंदे,प्रभारी भाऊसाहेब मंडलिक ,माजी नगरसेवक व समताचे शहर अध्यक्ष प्रमोद मंडलिक,अगस्ती संचालक बाळासाहेब ताजणे,संतोष मुतडक,इ . मान्यवर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. या प्रसंगी अकोले तालुक्यातील ओबीसी कार्यकर्त्यांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन अकोले तालुका समता परिषद व पदाधिकारी अकोले तालुका ओबीसी महासंघाचे वतीने करण्यात आले आहे