शाहु महाराज चे कुलगुरू कटियार , हवामान तज्ञ पंजाबराव डक शनि दरबारी!

श्रावण शनिवारी पहिल्याच दिवशी मोठी गर्दी
सोनई– प्रतिनिधी
छत्रपती शाहू महाराज विद्यापीठ कानपुर उत्तर प्रदेश या विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरदचंद्र कटियार यांनी कुटूंबातील सदस्य सदस्यांसह व हवामान तज्ञ पंजाबराव डक यांनी अभिषेक करून शनि दर्शन, घेतले.
यावेळी त्यांच्या समवेत डाॅ नंदकिशोर प्राचार्य एस. डी. महाविद्यालय होशायरपुर पंजाब ,प्रा किरण शेंडे वाणिज्य विभाग एम .व्हि. के. टी .महाविद्यालय देवळाली कॅम्प नासिक, प्रा .किरण मोनाड, भोतिक शास्त्र विभाग एम. व्हि. के. टी .महाविद्यालय ,देवळाली कॅम्प, नासिक हे होते.
देवस्थान चे अध्यक्ष भागवत बानकर व विश्वस्त शहाराम दरंदले यांनी मान्यवरांचा सन्मान केला.आज श्रावण महिन्यातील पहिल्याच दिवशी भाविकांनी पहाटेपासून मोठी गर्दी केली होती. शनि दर्शनाने मनाला शांती मिळाली देवस्थान मार्फत सुरु असलेल्या उपक्रमाची माहिती शंकरराव गडाख मित्र मंडळाचे सदस्य संतोष तेलोरे यांनी दिली. देवस्थान ट्रस्ट मार्फत सुरू असलेल्या कामाची माहिती तेलोरे यांनी दिली येथील परिसर पाहुन त्यांनी समाधान व्यक्त केले.
शनिभक्त शनिचौथऱ्यावर नतमस्तक
देवस्थानच्या प्रशासनाने श्रावण महिन्यात भाविकांसाठी पहाटे पाच ते सात ( दोन तास) आरती झाल्यानंतर भाविकांना शनिचौथर्यावर जाऊन शनिस्पर्श दर्शन मोफत उपलब्ध करून दिले,यामुळे सकाळी भाविक लवकर उठून चौथरा शनिदर्शनासाठी गर्दी झाली होती.