आजचे पंचांग व राशिभविष्य दि.०७/०६/२०२४

🙏🙏 सुप्रभात 🙏🙏
🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- ज्येष्ठ १७ शके १९४६
दिनांक :- ०७/०६/२०२४,
वार :- भृगवासरे(शुक्रवार)
🌞सुर्योदय:- सकाळी ०५:५३,
🌞सुर्यास्त:- सांयकाळी ०७:०३,
शक :- १९४६
संवत्सर :- क्रोधी
अयन :- उत्तरायण
ऋतु :- वसंतऋतु
मास :- ज्येष्ठ
पक्ष :- शुक्लपक्ष
तिथी :- प्रतिपदा समाप्ति १६:४६,
नक्षत्र :- मृग समाप्ति १९:४३,
योग :- शूल समाप्ति २०:०४,
करण :- बालव समाप्ति २८:१६,
चंद्र राशि :- वृषभ,(०७:५६नं. मिथुन),
रविराशि – नक्षत्र :- वृषभ – रोहिणी,
गुरुराशि :- वृषभ,
शुक्रराशि :- वृषभ,
राशिप्रवेश :- राशिप्रवेश नाहीत
शुभाशुभ दिवस:- करिदिन वर्ज्य दिवस,
✿राहूकाळ:- सकाळी १०:५० ते १२:२८ पर्यंत,
♦ लाभदायक वेळा
लाभ मुहूर्त — सकाळी ०७:३२ ते ०९:११ पर्यंत,
अमृत मुहूर्त — सकाळी ०९:११ ते १०:५० पर्यंत,
शुभ मुहूर्त — दुपारी १२:२८ ते ०२:०७ पर्यंत,
❀ दिन विशेष:
दशहरारंभ, करिदिन, चंद्रदर्शन (२०:२४ प.), मु. ३० साम्यार्घ, मृग रवि २०:०५, वाहन कोल्हा, पु.स्त्री.सू.चं., इष्टि, प्रतिपदा श्राद्ध,
———
🐾🐾🐾🐾🐾🐾🐾🐾🐾
आजचा दिवस सुखाचा जावो मन प्रसन्न राहो!!!!!
💐🌺🌼🌹🌾🍀🌻🌷🌸
🌏 दैनिक राशीभविष्य 🌏
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- ज्येष्ठ १७ शके १९४६
दिनांक = ०७/०६/२०२४
वार = भृगवासरे(शुक्रवार)
मेष
कामानिमित्त संपर्कात वाढ होईल. महत्त्वाचे निर्णय विचारपूर्वक घ्या. वडीलधार्यांचा सल्ला विचारात घ्यावा. आपला ठसा उमटवण्याचा प्रयत्न कराल. मित्रांशी वाद वाढवू नका.
वृषभ
सर्व बाबतीत आनंद मानाल. व्यावसायिक आघाडीवर महत्त्वाची कामे कराल. नोकरदारांची जबाबदारी वाढेल. आर्थिक मान सुधारेल. मानसिक अस्वस्थता वाढवू नका.
मिथुन
हाती घेतलेल्या कामात पूर्तता येईल. कामाचा फार ताण घेऊ नका. बोलतांना वाणीवर संयम ठेवावा लागेल. वरिष्ठ नाराज होणार नाहीत याची काळजी घ्या. मनातील इच्छा पूर्ण होईल.
कर्क
फसवणुकीपासून सावध राहावे. व्यवसायिकांना चांगला आर्थिक लाभ होईल. कौटुंबिक खर्च अचानक वाढू शकतो. बौद्धिक चर्चेत सहभागी होऊ नका. मनातील निराशा दूर सारावी.
सिंह
प्रत्येक कृती संयमाने करावी. वादापासून चार हात दूर राहावे. घरातील ज्येष्ठाशी मतभेद संभवतात. कागदपत्रांवर सही करतांना दक्षता बाळगा. लबाड लोकांपासून वेळीच दूर रहा.
कन्या
अचानक धनलाभाची शक्यता. परोपकाराच्या जाणिवेतून कामे कराल. पोटाच्या तक्रारी राहतील. बाहेरील अन्नपदार्थ खाणे टाळावे. जास्त संवेदनशील होऊ नका.
तूळ
द्विधा मन:स्थितीमुळे निर्णय घेताना कठीण होईल. काही महत्त्वाची कामे पार पडतील. व्यवहारात फार हटवादीपणा करू नका. क्रोधामुळे वाद वाढू शकतात. दिवसभरात चांगली आर्थिक कमाई होईल.
वृश्चिक
मानसिक प्रसन्नता लाभेल. घरातील वातावरण आनंदी ठेवण्याचा प्रयत्न कराल. जवळच्या ठिकाणच्या सहलीचे आयोजन कराल. जोडीदाराला खुश ठेवण्याचा प्रयत्न करावा. कौटुंबिक शांतता जपावी.
धनू
प्रत्येक कृती संयमाने करावी. मानसिक चिंता दूर साराव्यात. मुलांचा खोडकरपणा वाढीस लागेल. जोडीदाराविषयी गैरसमज संभवतात. प्रवास जपून करावा.
मकर
जवळच्या मित्रांशी भेट होईल. कामे मनाजोगी पार पडतील. बोलताना शब्दांचे वजन लक्षात घ्या. प्रेमप्रकरणात नवीन आशा पल्लवीत होईल. अचानक धनलाभाची शक्यता.
कुंभ
व्यावसायिक ठिकाणी कामाचे कौतुक होईल. उत्तम वाहन सौख्य लाभेल. मुलांशी क्षुल्लक कारणांवरून मतभेद संभवतात. जवळच्या ठिकाणी सहलीचा आनंद घ्याल. मित्र-मैत्रिणींचा गोतावळा जमा कराल.
मीन
वरिष्ठांशी संबंध सुधारण्याचा प्रयत्न करा. मानसिक चिंता बाजूला साराव्यात. कौटुंबिक वातावरण तुमच्या आवडीचे राहील. वादाच्या मुद्यांपासून दूर राहावे. शारीरिक कंटाळा झटकून टाकावा.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर