
माका प्रतिनिधी
नेवासा तालुक्यातील माका येथे आज दिनांक 07/06/2024 रोजी मंकावती देवी मंदिर येथे कृषी विभाग व कृषी विज्ञान केंद्र दहिगाव ने मार्फत खरिप हंगाम पूर्व तंत्रज्ञान बद्दल शेतकरी कार्यशाळा पार पडली
सदर कार्यशाळा मध्ये श्री धनजय हिरवे तालुका कृषी अधिकारी नेवासा व श्री नारायण नीबे शास्त्रज्ञ दहिगव ने प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते श्री निबे यांनी कापुस, ऊस, तूर पीक तत्रज्ञान बद्दल सविस्तर मार्गदर्शन केले तसेच तालुका कृषी अधिकारी श्री हिरवे यांनी बीज प्रक्रिया महत्व, शेतकऱ्यांनी खताच वापर कमी करून दस्परणी अर्क, गांडूळ खत च वापर जास्तीत जास्त करून कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन घेण्याकरिता मार्गदर्शन केले, तसेच शेतकऱ्यांनी बाजारातील वाणाची निवड करत असताना एकच वाणाची मागणी न करता जमीन, पाण्याची उपलब्धता बघुनच निवड करावे असे आवाहन करण्यात आले ,
श्री दिलीप मस्के यांचे शेतावर जाऊन तालुका कृषी अधिकारी व कृषी सहायक रूपेश पवार यांच्या कडून कापुस लागवड करण्यात आले