राजूर येथील सर्वोदय विदया मंदिर येथे क्रीडा महोत्सव संपन्न.

अकोले/प्रतिनिधी–
विदयार्थ्यांना फक्त चार भिंतीच्या आतीलच शिक्षण देणे महत्त्वाचे नसुन त्याचबरोबर त्यांच्या सुप्त कलागुणांचाही विकास होणे तितकेच महत्त्वाचे असते.बौद्धिक ज्ञानाबरोबरच शारिरीक विकास देखिल तितकाच महत्त्वाचा घटक आहे.
हाच उद्देश समोर ठेवून गुरूवर्य रा.वि.पाटणकर सर्वोदय विदया मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विदयालय राजूर येथे विदयालयाचे प्राचार्य भाऊसाहेब बनकर व उपप्राचार्य अण्णासाहेब धतुरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच क्रीडा शिक्षक जालिंदर आरोटे व विनोद तारू यांच्या शिस्तबद्ध नियोजनानुसार सर्व शिक्षक व विदयार्थ्याच्या सहकार्याने आंतरशालेय वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साही वातावरणात संपन्न झाला.

या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ५७ महाराष्ट्र बटालियन एन.सी.सी.अहमदनगर येथील नायब सुभेदार सुरेश शर्मा तसेच हवालदार नरेंद्र सिंग यांचे हस्ते ध्वजारोहण करून स्पर्धांचे उदघाटन करण्यात आले.नायब सुभेदार सुरेश शर्मा यांनी विदयार्थी जिवनातील खेळाचे महत्त्व याविषयी बहुमोल मार्गदर्शन केले.तसेच शुभेच्छा दिल्या.
प्राचार्य भाऊसाहेब बनकर यांनी शिस्तीच्या सुचना दिल्या.तसेच सर्व विदयार्थ्यानी क्रीडा स्पर्धांत सहभाग घेऊन खेळांचा मनमुराद आनंद लुटण्याचे अव्हान केले.
या क्रीडा मोहत्सवानिमित्त कबड्डी, धावणे,थाळीफेक,गोळाफेक,रस्सीखेच,हॉलीबॉल आदी स्पर्धा घेण्यात आल्या.क्रीडा स्पर्धांबरोबरच विदयार्थ्यांसह शिक्षकांनीही आनंद मेळाव्याचाही मनमुराद आनंद घेतला.या स्पर्धांत प्रथम तिन क्रमांक काढण्यात आले.या गुणवंत विदयार्थ्याना पारितोषिक वितरणामध्ये सन्मानचिंन्ह तसेच प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याचे प्राचार्य भाऊसाहेब बनकर यांनी सांगितले.
क्रीडा स्पर्धा संपन्न करण्यासाठी प्राचार्य भाऊसाहेब बनकर,उपप्राचार्य अण्णासाहेब धतुरे,क्रीडा प्रमुख जालिंदर आरोटे व प्रा.विनोद तारू यांसह प्रा.दिपक बुऱ्हाडे,प्रा.संतोष कोटकर,प्रा.शरद तुपविहिरे,प्रा.बीना सावंत,प्रा.स्मिता हासे,प्रा.आरती देशमुख,प्रा.संतराम बारवकर,प्रा.बाळासाहेब घिगे,प्रा. संतोष नवले,प्रा.सुरेश शेटे,प्रा.रविंद्र मढवई,प्रा.सचिन लगड,प्रा.अमोल तळेकर,प्रा.विकास जोरवर,प्रा.सुधिर आहेर,प्रा.संतोष बारामते,प्रा.अजित गुंजाळ,प्रा.रविंद्र कवडे,प्रा.सुरेखा नवाळी,प्रा.मधुमंजिरी पवार,प्रा.कांचन सोनार तसेच विदयार्थी आदिंनी परिश्रम घेतले.