आठवलेंना मंत्रीमंडळात संधी अकोल्यात स्वागत

अकोले प्रतिनिधी
केंद्रीय मंत्रीमंडळात खासदर रामदास आठवले यांना पुन्हा संधी मिळाल्याने अकोल्यात आनंद व्यक्त करण्यात
केंद्रीय मंत्री मंडळात खासदार रामदास आठवले यांना मोदींनी पुन्हा समाजकल्याण राज्यमंत्री पदाची जबाबदारी दिल्याने आर पी आय नेते विजयराव वाकचौरे यांनी दिल्ली येथे रामदास आठवले यांनी भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले

राज्यसभेचे खासदार रामदास आठवले यांना नरेंद्र मोदींनी त्यांच्या मंत्रिमंडळात पुन्हा संधी दिली आहे. त्यांचा मंत्रीमंडळात समावेशाने अकोले तालुक्यात आनंद व्यक्त करत अकोले तालुका आर. पी. आय(युवक )चे तालुका अध्यक्ष विजय पवार यांनीं त्यांच्या निवडीचे स्वागत केले आहे
श्री पवार यांनी म्हटले आहे की रिपब्लिकन
पक्षाने सतत १० वर्षे मोदींना समर्थन दिले
आहे. देशातील दलित जनतेला भाजपाबरोबर आणण्याचे काम पक्षाने केले महाराष्ट्रात ही भाजपा सोबत राहून विधानसभेत महायुतीची सत्ता येण्यासाठी खासदार रामदास आठवले प्रयत्नशील आहेत म्हणून आर पी आय ने मोदींचे समर्थन केले आहे नरेंद्र मोदींचे विकासाचे काम जनतेसमोर नेण्याचे काम आर पी आय ने केले आहे केंद्रीय मंत्री मंडळात सामाजिक न्याय मंत्री पदाची जबादारी समर्थ पणे खासदार रामदास आठवले यांनी 10 वर्ष पार पाडली आहे म्हणून त्यांना पुन्हा तिसऱ्यांदा मंत्रीमंडळात संधी दिल्याचे तालुका अध्यक्ष विजय पवार यांनी म्हटले आहे