इतर

विज ऊद्योगातील कंत्राटी कामगार अन्याय विरोधात रस्त्यावर उतरणार

तर सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय नांदेड येथे लक्षवेधी आंदोलन करण्याचा ईशारा

नांदेड दि१७
भगवान श्री विश्वकर्मा जयंती राष्ट्रीय कामगार दिना निमित्त नांदेड विभागातील वीज ऊद्योगातील कंत्राटी कामगारांचा कामगार मेळावा भारतीय मजदूर संघ कार्यालय सन्मान प्रस्टीज येथे संपन्न झाला. या मेळावा मध्ये नांदेड, परभणी , हिंगोली येथील कंत्राटी कामगार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
या वेळी वीज ऊद्योगात रिक्त पदांवर सातत्याने व नियमीतपणे कामगार काम करीत असतानाही केवळ कामगारांना लागु असलेल्या नियमांचे, कायद्यातील तरतूदी चे पालन करणे करिता, कंपनीने ठरविलेले वेतन, व भत्ता ची मागणी केली म्हणून संघटनेचे पदाधिकारी व काही कामगारांना नोकरी पासून वंचित ठेवले आहे, या सर्व कामगारांना त्वरित कामावर रुजू करून घेतलं नाही तर संघटना रस्त्या वर उतरून तीव्र त्आंदोलन करण्याचा ईशारा महाराष्ट्र विज कंत्राटी कामगार संघ (संलग्न भारतीय मजदूर संघ) चे सरचिटणीस सचिन मेंगाळे व कार्याध्यक्ष उमेश आणेराव यांनी मेळावा मध्ये मार्गदर्शन करताना दिला
ग्राहकांना सेवा पुरविताना ऊन वारा पाऊस याची तमा न बाळगता कंत्राटी कामगार झटत असतो पण या कामगारांना किमान वेतन कागदोपत्री दिले जाते. मिळणारे अल्प वेतन सुध्दा वेळेवर मिळत नाही. व जो कामगार या बाबतीत अन्यायाला वाचा फोडील त्यालाच नोकरी पासून वंचित ठेवले जाते असाच अनुभव मागील काळात संघटनेला आला आहे. या बाबतीत संघटनेने मा सहाय्यक कामगार आयुक्त नांदेड येथे दाद मागितली असुन अद्याप विविध विविध मागण्या कामगार कार्यालय कडे प्रलंबितच आहेत. या सरकारचे, प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय नांदेड येथे लक्षवेधी आंदोलन करण्याचा ईशारा संघटनेचे सरचिटणीस सचिन मेंगाळे यांनी दिला आहे.
महाराष्ट्र विज कंत्राटी कामगार संघांचे ऑक्टो 8 व 9 रोजी नागपूर येथे होणार असुन या मध्ये नांदेड, परभणी, हिंगोली मधील कामगारांनी मोठ्या संख्येत सहभागी व्हावे असे आवहान केले आहे.

या वेळी भगवान श्री विश्वकर्मा जयंती राष्ट्रीय कामगार दिना निमित्त भगवान श्री विश्वकर्मा हे विश्वातील पहिला कारागीर, आहे, व 17 सप्टेंबर हा दिवस राष्ट्रीय कामगार दिन म्हणून साजरा केला जातो. असे नमुद केले आहे.
तरी कंत्राटी कामगारांचे समस्या न सुटल्यास भारतीय मजदूर संघ या कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी संघर्ष करेल असे भारतीय मजदूर संघ नांदेड जिल्हा अध्यक्ष बालाजी निलावर यांनी सांगितले आहे.
या मेळाव्यात महाराष्ट्र विज कंत्राटी कामगार संघांचे सरचिटणीस सचिन मेंगाळे, कार्याध्यक्ष उमेश आणेराव, भारतीय मजदूर संघ नांदेड जिल्हा अध्यक्ष बालाजी निलावर, भंड्ळकर, झोन अध्यक्ष नरेंद्र दिनकर, हिंगोली जिल्हा अध्यक्ष श्री यशवंत दिपके, निलेश गदगे, व मोठ्या संख्येने कामगार सहभागी झाले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button