आजचे पंचांग व राशिभविष्य दि.१६/०६/२०२४

🙏🙏 सुप्रभात 🙏🙏
🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- ज्येष्ठ २६ शके १९४६
दिनांक :- १६/०६/२०२४,
वार :- भानुवासरे(रविवार),
🌞सुर्योदय:- सकाळी ०५:५४,
🌞सुर्यास्त:- सांयकाळी ०७:०६,
शक :- १९४६
संवत्सर :- क्रोधी
अयन :- उत्तरायण
ऋतु :- ग्रीष्मऋतु
मास :- ज्येष्ठ
पक्ष :- शुक्लपक्ष
तिथी :- दशमी समाप्ति २८:४४,
नक्षत्र :- हस्त समाप्ति ११:१३,
योग :- वरीयान समाप्ति २१:०२,
करण :- तैतिल समाप्ति १५:४२,
चंद्र राशि :- कन्या,
रविराशि – नक्षत्र :- मिथुन – मृग,
गुरुराशि :- वृषभ,
शुक्रराशि :- मिथुन,
राशिप्रवेश :- राशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- उत्तम दिवस,
✿राहूकाळ:- संध्या. ०५:२७ ते ०७:०७ पर्यंत,
♦ लाभदायक वेळा
लाभ मुहूर्त — सकाळी ०९:१२ ते १०:५१ पर्यंत,
अमृत मुहूर्त — सकाळी १०:५१ ते १२:३० पर्यंत,
शुभ मुहूर्त — दुपारी ०२:०९ ते ०३:४८ पर्यंत,
❀ दिन विशेष:
गंगावतार, दशहरा समाप्ति, गंगा पूजनाने दहा प्रकारची पापे नष्ट होतात, अमृत ११:१३ प.,
————–
🐾🐾🐾🐾🐾🐾🐾🐾🐾
आजचा दिवस सुखाचा जावो मन प्रसन्न राहो!!!!!
💐🌺🌼🌹🌾🍀🌻🌷🌸
🌏 दैनिक राशीभविष्य 🌏
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- ज्येष्ठ २६ शके १९४६
दिनांक = १६/०६/२०२४
वार = भानुवासरे(रविवार)
मेष
करमणुकीत अधिक वेळ घालवाल. सकस आहार घ्यावा. सामुदायिक बाबींमध्ये फार लक्ष घालू नका. कामाच्या ठिकाणी होणारे बदल लक्षात घ्या. मुलांकडून चांगला प्रतिसाद मिळेल.
वृषभ
घरगुती वातावरण प्रसन्न राहील. तुम्ही जबाबदारी उत्तम रित्या पेलू शकाल. कौटुंबिक वातावरणाचा मनमुराद आनंद घ्याल. व्यापारात अपेक्षित लाभ मिळेल. विलंबित कामे पूर्ण होऊ शकतील.
मिथुन
आजचा दिवस आपल्यासाठी शुभ आहे. काही कामे रखडल्यासारखी वाटू शकतात. क्षणिक आनंदाने हुरळून जाल. पत्नीची आपल्याला उत्तम साथ मिळेल. उत्तम वाहन सौख्य लाभेल.
कर्क
व्यापार्यांना चांगला लाभ संभवतो. मनावरील दडपण दूर करण्याचा प्रयत्न करावा. कौटुंबिक प्रश्न मार्गी लागतील. जोडीदाराचा स्वभाव अचंबित करण्यासारखा वाटू शकतो. अती आवश्यक असेल तरच प्रवास करावा.
सिंह
दिवस मनाजोगा व्यतीत कराल. इतरांवर तुमच्या व्यक्तिमत्वाचा चांगला प्रभाव पडेल. कामात अधिकार्यांचे सहकार्य मिळेल. दूरच्या लोकांशी योग्य वेळी संपर्क साधला जाईल. अंगीभूत कलेचे कौतुक केले जाईल.
कन्या
मतभेदा पासून चार हात दूर रहा. विचारांना योग्य दिशा द्यावी. नवीन योजना तयार ठेवाव्यात. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. सखोल तांत्रिक ज्ञान मिळवावे.
तूळ
दिवस चांगल्या आर्थिक लाभाचा असेल. केलेली गुंतवणूक योग्य वेळी कामी येईल. तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होईल. जुन्या कामातून अचानक लाभ संभवतो. बाहेरील अन्नपदार्थ टाळावेत.
वृश्चिक
क्रोध भावनेला आवर घालावा. मुलांच्या स्वतंत्र वृत्तीचा विचार करावा लागेल. कामाच्या ठिकाणी सन्मानास पात्र व्हाल. योग्य संधीसाठी थोडा धीर धरावा. काही कामे तुमचा कस पाहू शकतील.
धनू
कौटुंबिक वातावरण तप्त राहील. जोडीदाराची बाजू समजून घेण्याचा प्रयत्न करावा. आततायीपणे कोणताही निर्णय घेऊ नका. दुचाकी वाहन चालवताना सतर्क रहा. मनातील परोपकाराची जाणीव जागृत ठेवा.
मकर
अचानक धनलाभाची शक्यता. मनात नसत्या शंका आणू नका. भावंडांशी खटके उडण्याची शक्यता. प्रेमप्रकरणातील गोडी वाढेल. आरोग्यात काहीशी सुधारणा दिसून येईल.
कुंभ
नवीन मित्र जोडण्याचा प्रयत्न करा. जवळच्या नातेवाईकांचे सहकार्य मिळेल. जोडीदार तुमच्यावर खुश राहील. भागीदारीतून चांगली कमाई करता येईल. बोलतांना संयम बाळगा.
मीन
कामात क्षुल्लक अडचण येऊ शकते. नोकरदारांना दिवस चांगला जाईल. सहकार्याकडून मदतीची अपेक्षा ठेवू शकता. कलेचा मनमुराद आनंद लुटता येईल. छंद जोपासायला वेळ काढा.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर