इतर

पठारवाडीत कुकडी कालवा फुटण्याची शक्यता….?

दत्ता ठुबे

पारनेर : पठारवाडी ता पारनेर येथील कुकडी प्रकल्पाच्या ४९ किमी कालव्यात मोठी दरड कोसळली आहे. सध्या कुकडी डाव्या कालव्यातुन उन्हाळी आर्वतन चालु आहे. कालवा सध्या पूर्ण पूर्ण क्षमतेने भरून वाहत आहे.शुक्रवारी संध्याकाळी ५ वाजेच्या सुमारास हि दरड कोसळली. त्यामुळे मोठा कालव्यात पाण्याचा मोठा फुगारा निर्माण झाला. हि बाब स्थानिक ग्रामस्तांनी प्रकल्पाचे अधिकारी यांना कळवताच त्यांनी पाणी इतरत्र सोडून कमी केले आहे. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. पठारवाडी परीसरात कालव्याला मोठा मातीचा भरावा आहे. त्यामुळे या ठिकाणी भविष्यात अशी दुर्घघटना होण्याची शक्यता आहे.
या परिसरात डोंगर पोखरून कालवा तयार करण्यात आलेला आहे. येथे कॅनॉलला सुमारे १०० फुटांचा डीप कट आहे. याच परीसरात कुकडी प्रकल्पाने सुमारे ४० एकर जमीन संपादित केली आहे. याच जागेवर कुकडी प्रकल्पाचे
कामासाठी लागणारी खडी, डबर तयार करण्यासाठी शासकिय खडी क्रशर उभारण्यात आलेले होते. हि ४० एकर जागा डिप कट चे खंदक टाकणेसाठी प्रकल्पाने संपादित केलेली आहे.
प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यावर याच ठिकाणी अतिक्रमण करून खाजगी खडी क्रशर उभारण्यात आलेले आहे. गेल्या पंचविस वर्षापासुन येथे बेकायदेशीर उत्खनन चालु आहे. याबाबत प्रकल्पाचे अधिकारी यांनाच येथे प्रकल्पाची मोठी जागा आहे हे माहित नाही. म्हणुन या प्रकरणी सा. कार्यकर्ते भानुदास साळवे यांनी राष्ट्रीय हरीत लवादाकडे याचिका दाखल केली होती. या याचिकेत खाणीतील स्पोटांमुळे दरड कोसळून कॅनॉल फुटण्याचा धोका व्यक्त केला होता. हरित लवादाने पर्यावरण, जलसंपदा. महसुल, स्थानिक पंचायत यांना नोटीस बजावुन म्हणने मागविले होते. त्यानंतर याच भ्रष्ट जलसंपदा, महसुल, पर्यावरण, उर्जा विभाग व स्थानिक ग्रामपंचायत यांनी संगणमताने खाण धारकांना मदत होईल अशी भुमिका घेतली होती. या कालव्याच्या कडेने असलेल्या रस्त्याने खाण धारकांची ५० ते ६० टन वजनाची वाहने बेकायदा वाहतुक त्यामुळे कॅनॉलचा रस्ता खचला आहे. या परीससरात दोन खाजगी खाणी आहेत.
कुकडी प्रकल्पाचे अधिकारी यांच्या संगणमताने हि वाहतुक चालु आहे. कुकडीचे अधिकारी यांना मोठी पाकीटे यासाठी पुरवली जातात. महसुल अधिकारी यांचीही खाण घारकांवर मेहरनजर आहे. पर्यावरण विभाग हप्ते घेवून शांत आहे. स्थानिक ग्रामपंचायत पदाधिकारी राजकारणाच्या बेरजा व महीन्याचे पाकीट घेवुन मुग गिळून आहेत. उर्जा विभाग रात्रीची बोगस वीज पुरवठा करून मोठी हप्तेखोरी घेवून गप्प आहेत. स्थानिक नागरीक आपल्याला काय करायचे म्हणुन हाताची घडी तोंडावर बोट.
त्यामुळे मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button