मराठा समाजाची आरक्षणाची मागणी रास्त – सभापती गोकुळ दौड

शहाराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी
मराठा समाजातील पिढ्यान पिढ्याचा होत असलेला आन्याय दूर करायचा असेल तर आरक्षण मिळालेच पाहिजे आणि ते घेण्यासाठी गोदाकाठचा ढाण्या वाघ संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील समर्थ आहे. मराठा आरक्षण प्रश्नी मी मराठा समाज बांधवा बरोबर आहे असे मत पाथर्डी पंचायत समितीचे सभापती गोकुळभाऊ दौड यांनी व्यक्त केले.
शेवगाव तालुक्यातील भातकुडगाव फाटा चौफुल्यावर मराठा आरक्षण प्रश्नी मनोज जरांगे पाटील यांनी उभारलेल्या मराठा आरक्षणाच्या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी सुरु आलेल्या उपोषणाच्या तिसऱ्या दिवशीच्या आमरण उपोषणाला पठिंबा दिल्या नंतर ते उपस्थित समाज बांधवाना संबोधतांना म्हणाले कि, शासनाने तात्काळ आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा. मराठा समाजातील विद्यार्थ्यांना न्याय द्यावा. सामान्य मराठ्याना आरक्षण फार महत्वाचे आहे. तीच वेदना घेऊन मनोज जरांगे पाटील लढत आहे. यासाठी आता विलंब नको तात्काळ निर्णय व्हावा असे मत त्यांनी मांडले. यावेळी आमरण उपोषणकर्ते भायगावचे सरपंच राजेंद्र आढाव व जोहरापुरचे माजी सरपंच अशोक देवढे यांची भेट घेऊन पाठिबा दिला. यावेळी साखळी उपोषणामधें चंद्रकांत महाराज लबडे, दिलीपराव लांडें, शेतकरी बचाव जन आंदोलानाचे अध्यक्ष एकनाथ काळे, बाळासाहेब काळे, भायगावचे माजी सरपंच अशोक दुकळे, तुकाराम शिंगटे, शंकरराव नारळकर, भगवान आढाव उपस्थित होते.
यावेळी जनशक्ती विकास आघाडीच्या जिल्हा परिषद सदस्या हर्षदाताई काकडे, वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष किसन चव्हाण, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विठठलराव लंघे राजाभाऊ पाऊलबुद्धे, मिलिंद कुलकर्णी, नामदेव मराठे, किरण धुरट (छत्रपती संभाजीनगर ) डॉ.दादासाहेब काकडे, अमोल पंडीत, नितीन काळे, चंद्रकांत रसाळ, बाबासाहेब व्यवहारे, राहुल आर्ले, रामेश्वर फाटके, संतोष आढाव, पांडुरंग उभेदळ, विठ्ठल फटांगरे, देवदान वाघमारे, विशाल सामृत, अमोल खाटीक, अदिनाथ थोरे यांच्या सह यावेळी नेवासा तालुवयातील पाथरवाला येथील युवकांची मोटरसायकल रॅली अंतरवाली सराटीकडे जात असताना त्यांनीही या ठिकाणी थांबून उपोषणास पाठिंबा दिला.
शेवगाव तालुक्यातील पत्रकाराच्या वतीने पठिंबा…..
संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आदेशानुसार भातकुडगाव फाटा येथे सुरु असलेल्या आमरण उपोषणास तालुक्यातील दादासाहेब डोंगरे, रावसाहेब मरकड, शहाराम आगळे, बाळासाहेब जाधव, शंकरराव मरकड,तारामती दिवटे, रविंद्र मडके, सुरेश पाटील, राम साळुंके, राजेंद्र पानकर, नेवाशाचे प्रकाश फोपसे, प्रविण खोमणे, आर.आर. माने, बाळासाहेब पानकर, गणेश शिंदे अदि पत्रकारांनी पठिबा दिला.