इतर

ओबीसी आरक्षण बचावासाठी वडीगोद्री येथे प्रा.लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे यांचे उपोषण, समता परिषद शिष्टमंडळाने घेतली भेट!

नाशिक,दि.१८ जून :- ओबीसी आरक्षणाच्या बचावासाठी वडीगोद्री येथे प्रा.लक्ष्मण हाके व त्यांचे सहकारी नवनाथ वाघमारे यांनी उपोषण सुरू केले आहे. राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या सूचनेनुसार आज अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष दिलीप खैरे, बाळासाहेब कर्डक, प्रदेश चिटणीस समाधान जेजुरकर यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी प्रा.लक्ष्मण हाके यांच्यासह आंदोलकांची भेट घेत पाठिंबा दिला.

ओबीसी आरक्षणाच्या बजावसाठी राज्यात विविध ठिकाणी आंदोलन उपोषण सुरू आहे. जालना जिल्ह्यातील वडीगोद्री येथे मागासवर्ग आयोगाचे माजी सदस्य प्रा.लक्ष्मण हाके यांच्यासह नवनाथ वाघमारे हे उपोषण करत आहे. राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी प्रा.लक्ष्मण हाके यांच्यासह आंदोलकांची फोनवरून चर्चा केली. त्यानंतर त्यांच्या सूचनेनुसार अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या शिष्टमंडळाने आज वडीगोद्री येथील आंदोलनस्थळी प्रा.हाके यांच्यासह सहकाऱ्यांची भेट घेतली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button