इतर

आजचे पंचांग व राशिभविष्य दि.१९/०६/२०२४

🙏🙏 सुप्रभात 🙏🙏


🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- ज्येष्ठ २९ शके १९४६
दिनांक :- १९/०६/२०२४,
वार :- सौम्यवासरे(बुधवार),
🌞सुर्योदय:- सकाळी ०५:५५,
🌞सुर्यास्त:- सांयकाळी ०७:०७,
शक :- १९४६
संवत्सर :- क्रोधी
अयन :- उत्तरायण
ऋतु :- ग्रीष्मऋतु
मास :- ज्येष्ठ
पक्ष :- शुक्लपक्ष
तिथी :- व्दादशी समाप्ति ०७:२९,
नक्षत्र :- विशाखा समाप्ति १७:२३,
योग :- सिद्ध समाप्ति २१:११,
करण :- कौलव समाप्ति १९:४५,
चंद्र राशि :- तुला,(११:०५नं. वृश्चिक),
रविराशि – नक्षत्र :- मिथुन – मृग,
गुरुराशि :- वृषभ,
शुक्रराशि :- मिथुन,
राशिप्रवेश :- राशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- संध्या. ०७नं. चांगला दिवस,

✿राहूकाळ:- दुपारी १२:३१ ते ०२:१० पर्यंत,

लाभदायक वेळा
लाभ मुहूर्त — सकाळी ०५:५५ ते ०७:३४ पर्यंत,
अमृत मुहूर्त — सकाळी ०७:३४ ते ०९:१३ पर्यंत,
शुभ मुहूर्त — सकाळी १०:५२ ते १२:३१ पर्यंत,
लाभ मुहूर्त — संध्या. ०५:२८ ते ०७:०७ पर्यंत,

❀ दिन विशेष:
प्रदोष, एकादशी व्रताचे फलप्राप्ती करिता सोने, साखर व जलकुंभ दान करणे, घबाड १७:२३ नं., अमृत १७:२३ नं., त्रयोदशी श्राद्ध,
————–


🐾🐾🐾🐾🐾🐾🐾🐾🐾
आजचा दिवस सुखाचा जावो मन प्रसन्न राहो!!!!!
💐🌺🌼🌹🌾🍀🌻🌷🌸

🌏 दैनिक राशीभविष्य 🌏


राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- ज्येष्ठ २९ शके १९४६
दिनांक = १९/०६/२०२४
वार = सौम्यवासरे(बुधवार)

मेष
चैनीच्या वस्तु खरेदी कराल. ओळखीच्या लोकांकडून मदत मिळेल. योग्य ठिकाणी गुंतवणूक करता येईल. थोडी काटकसर करावी लागेल. सामाजिक कामात मदत कराल.

वृषभ
चांगले वैवाहिक सौख्य लाभेल. नवीन मित्र जोडले जातील. सर्व गोष्टींकडे आनंदी दृष्टीकोनातून पहाल. खूप दिवसांपासूनची हौस भागवता येईल. लोक तुमच्या व्यक्तिमत्वाकडे आकर्षित होतील.

मिथुन
काही गोष्टी लपविण्याकडे तुमचा कल राहील. मनातील चुकीच्या कल्पना काढून टाकाव्यात. क्षणिक आनंदावर समाधान मानावे लागेल. इच्छेविरूद्ध काही गोष्टी कराव्या लागू शकतात. विचार योग्य प्रकारे मांडावेत.

कर्क
व्यवसायातून चांगला आर्थिक लाभ संभवतो. जवळचा प्रवास मजेत पार पडेल. कामानिमित्त दिवसभर बाहेर राहाल. कामात स्त्रियांची मदत मिळेल. मनातील जुनी इच्छा पूर्ण होईल.

सिंह
तुमच्यातील सुप्त गुण इतरांच्या नजरेत येतील. चारचौघात कौतुकास पात्र व्हाल. सजावटीवर अधिक भर द्याल. घरात टापटीप ठेवाल. बोलण्यातून इतरांची मने जिंकून घ्याल.

कन्या
तुमच्यातील कालगुणांना चांगला वाव मिळेल. कलेला चांगले पोषक वातावरण लाभेल. काही महत्त्वाच्या कामांना खीळ बसू शकते. स्वत:च्या फायद्याचा आधी विचार कराल. धार्मिक स्थळांना भेट द्याल.

तूळ
मनाच्या चंचलतेला आवर घालावी. एकसूत्री विचार करून चालणार नाही. पैज जिंकता येईल. कमी श्रमातून पैसे कमवाल. सांपत्तिक दर्जा सुधारण्याचा प्रयत्न कराल.

वृश्चिक
एकमेकांची बाजू समजून घ्याल. भागीदारीत एकोप्याने कामे कराल. संपर्कातील लोकांशी घनिष्ठ संबंध निर्माण होतील. जोडीदार तुमच्यावर खुश असेल. चारचौघात तुमची वाहवा केली जाईल.

धनू
आपले मत इतरांना नीट समजावून सांगावे. लोकोपवादाकडे दुर्लक्ष करावे. हाताखालील लोकांकडून चांगले सहकार्य मिळेल. आळस झटकून टाकावा लागेल. नातेवाईक मदतीला उभे राहतील.

मकर
तुमच्यातील कलागुण इतरांच्या नजरेत येतील. छंद जोपासायला अधिक वेळ द्याल. मित्र परिवार गोळा कराल. कलात्मक दृष्टीकोन ठेवाल. निसर्ग सौंदर्यात रमून जाल.

कुंभ
दिवस समाधानात जाईल. नवीन गोष्टीत अधिक रुची दाखवाल. घरगुती कामे वेळेत पूर्ण होतील. उत्तम वाहन सौख्य लाभेल. आवडत्या वस्तु खरेदी केल्या जातील.

मीन
वाचनाची आवड जोपासता येईल. इतरांचे मनापासून कौतुक कराल. जवळच्या लोकांच्या आनंदात आनंद मानाल. चांगली कल्पना शक्ति लाभेल. प्रवासाची हौस भागवाल.

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button