इतर
यात्रेत गोंधळ घालणाऱ्या आरोपीला पोलीस कोठडी

दत्तात्रय शिंदे
माका प्रतिनिधी
नेवासा तालुक्यातील सोनई जवळील धनगरवाडी येथे दि. ३१ मार्च रोजी यात्रेनिमित्ताने हगाम्याचे आयोजन करण्यात आले होते. हगामा सुरू असताना गावातील संभाजी पालवे याने यात्रा कमिटीचे अध्यक्ष व ग्रामस्थांना शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली होती. तलवारीचा नंगा नाच केला होता.
याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
याप्रकरणी पालवे फरार होता.आज सकाळी त्यास अटक
करण्यात आली. न्यायालयात हजर केले असता त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली. याचा अधिक तपास पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक झांबरे करीत आहेत.