130 बॅग रक्तदानाने उद्योजक माणिकराव डावरे यांचा वाढदिवस साजरा…

अकोले प्रतिनिधी-
रोटरी क्लब अकोले सेंट्रल च्या वतीने अकोले तालुक्याचे भूमिपुत्र, यशस्वी उद्योजक, प्रोफाईव्ह इंजिनीरिंग कंपनी चे डायरेक्टर माणिकराव डावरे यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत त्यांचा गौरव म्हणून रक्तदान शिबिर व वृक्षरोपे वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी रोटरी क्लब ने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत उद्योजक माणिकराव डावरे यांच्या प्रोफाईव्ह इंजिनीरिंग कंपनी कुरुळी( चाकण) मधील 130 कामगार, कर्मचारी व अधिकारी यांनी रक्तदान करून आपले राष्ट्रीय कर्त्यव्य पार पाडले.
यासाठी
अक्षय ब्लड बँक,हडपसर यांनी विशेष सहकार्य केले.
तसेच या वाढदिवसानिमित्त पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी रोटरी क्लब चे पर्यावरण प्रोजेक्ट डायरेक्टर संदीप मालुंजकर यांच्या सहकार्याने 51 वृक्षरोपांचे वाटप करण्यात आले.व वृक्षारोपण करून वृक्षसंवर्धन करण्याचे कंपनीने आश्वासीत केले.
यावेळी माणिकराव डावरे यांच्या सारख्या युवकांना प्रेरणादायी असणाऱ्या व सर्वांना हवेहवेसे वाटणाऱ्या व्यक्तिमत्वाचा वाढदिवस रक्तदान शिबीर व वृक्षरोपे वाटप करून रोटरी क्लब अकोले ने साजरा केलेला सामाजिक उपक्रम कौतुकास्पद असून हा उपक्रम दरवर्षी घेण्यात यावा असे प्रतिपादन हिटाची अस्टोमी इंडिया चे रिजनल प्रेसिडेंट अनिल खांडेकर यांनी केले

यावेळी रोटरी क्लब अकोले सेन्ट्रलचे सेक्रेटरी विद्याचंद्र सातपुते यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना म्हणाले की, माणिकराव डावरे हे ध्येयाने पछाडलेले व्यक्तिमत्व असून त्यांच्या यशस्वी जीवनाचे रहस्य त्यांची जिद्द, परिश्रम,मेहनत, प्रामाणिकपणा आहे.तसेच आपण समाजाचे काही देणे लागतो या भावनेतून त्यांनी केलेले सामाजिक कार्य कौतूकास्पद असून समाजासाठी दखलपात्र आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी ही संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार मानतो.
सत्काराला उत्तर देतांना माणिकराव डावरे म्हणाले की, रोटरी क्लब चे सेक्रेटरी तथा माजी प्राचार्य यांनी या उपक्रमाची संकल्पना मांडली त्यावेळी मी त्यांना नकार देऊ शकलो नाही.कारण काळाची गरज म्हणून असे उपक्रम होणे गरजेचे आहे. म्हणून मी आजच्या सर्व कमिटमेंट बाजूला ठेवल्या.आपण सर्वांनी या सामाजिक उपक्रम राबवून माझा वाढदिवस साजरा केला त्याबद्दल मी रोटरी क्लब अकोले,अक्षय ब्लड बँक व सर्व माझ्या सहकार्याचा आभारी आहे.
यावेळी रोटरी क्लब च्या वतीने व उपस्थित मान्यवरांच्या वतीने माणिकराव डावरे यांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी होलिस्टिक कन्सल्टंट आदित्य पंडित, टाटा मोटर्स चे मॅनेजर नवनाथ जाधव,रोटरी क्लब अकोले सेंट्रल चे सेक्रेटरी ,सेवानिवृत्त प्राचार्य विद्याचंद्र सातपुते, सदस्य,यशस्वी व्यावसायिक भारत पिंगळे, शांताराम वैद्य,प्रोफाईव्ह इंजिनीरिंग कंपनी चे व्हाईस प्रेसिडेंट जगदीश काळेबेरे, प्लॅन्ट हेड अजित डावरे, सिनियर मॅनेजर पंकज कुंभारे, क्वालिटी हेड जावेद शेख, प्रॉडक्शन हेड जितेंद्र कोळी ,अक्षय ब्लड बँकेचे डॉ.स्वाती संयोजक दीपक देशमुख व त्यांचे सहकारी, प्रोफाईव्ह कंपनी चे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
अक्षय ब्लड बँकेतर्फे रक्तदात्यांना प्रमाणपत्र व प्रोफाईव्ह कंपनी आणि रोटरी क्लब ला सन्मानचिन्ह देण्यात आले.
या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी कंपनीचे एच आर हेड किरण थोरात, परचेस हेड तुषार वाडेकर, एच आर.मॅनेजर मारुती कटीगर, पंकज कुंभारे,मिलिंद जावळे, रोटरी क्लब चे सर्व पदाधिकारी, सदस्य, भारत पिंगळे, शांताराम वैद्य, किरण थोरात यांनी विशेष परिश्रम घेतले.
सूत्रसंचालन सुदर्शन देशपांडे यांनी केले तर आभार प्लॅन्ट हेड अजित डॉवरे यांनी मानले.