भायगावकरांचे प्रेरणादायी व्यक्तिमत्व दिगंबर बापुं शिलेदार यांचे निधन

शहाराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी
शेवगाव तालुक्यातील भायगाव येथील स्वातंत्र्यपुर्व काळातील गुरुजी, जुन्या पिढीतील आदर्श शिक्षक, नुकतेच भायगावकरांनी जीवनगौरव देऊन गौरवलेले , अनेक मानसन्मान पात्र, प्रगतशिल शेतकरी दिंगबर बापु शिलेदार यांचे नुकतेच वृध्दपकाळाने निधन झाले.
साधी सरळ राहणीमान असणाऱ्यां गुरुजीनी वेगवेगळे वर्तमानपत्र वाचताना कधीही शेवटच्या क्षणापर्यत वाचनासाठी चष्मा वापरला नाही.जीवनात वाचनाला नेहमी महत्व दया असा मौलीक सल्ला ते नेहमी देत असंत,त्यांच्या हाताखाली शिकलेली आनेकजण उच्च पदावर कार्यरत आहेत. ते आजही गुरुजी विषयी आदरपुर्वक बोलतात. हे गुरुजीच्या जीवनातील फार मोठे फलीत आहे.
तत्वनिष्ठ व विनोदी शैलीतुन बोलणाऱ्या गुरुजीनी मात्र स्वत:च्या तत्वाशी मात्र कधीही कोणाशी तडजोड केली नाही. शिक्षक हा शाळेतील असावा तो शाळा करणारां असू नये !असे मिश्किल बोलणेही ते नेहमी बोलून विनोद करायचे, खंबीरपणा हा माणसाला सन्मानाने जगायला शिकवतो म्हणुन खंबीर बनलं पाहिजे यावर ते नेहमी बोलायचे, जवळपास शंभरी गाठलेलेल्या, प्रचंड वाचन आसणाऱ्यां गुरुजीच्या जाण्याने प्रेरणादायी आदर्श गुरुजी गमावल्याची भावना भायगावकरांच्या मनात नेहमीच राहिल. त्याच्या पश्चात एक मुलगा, सुन, दोन मुली, जावई, नातवंडे, पणतु, असा मोठा परिवार आहे.कृषी विभागाच्या चिलेखनवाडी येथील फार्मवर कार्यरत असलेले बाबासाहेब शिलेदार यांचे ते वडील तर श्रीहरी कलेक्शनचे मालक ह.भ.प. हरी महाराज अकोलकर यांचे ते आजोबा होते.कोरोनासंदर्भातील शासकिय नियमाचे पालन करून अगदी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत मजलेशहर रोडवरील त्यांच्या राहत्या घरासमोरील शेतात रात्री उशिरा त्यांचा अंत्यविधी करण्यात आला. त्यांच्या निधनाने भायगावसह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.