इतर

दुधाला प्रतिलिटर 40 रुपये बाजार मिळावा व राज्यात दुध मुल्यअयोगाची स्थापना करावी

अकोले प्रतिनिधी

दुधाला कायम स्वरुपी प्रतिलिटर 40 रुपये बाजार मिळावा व राज्यात दुध मुल्यअयोगाची स्थापना व्हावी.आदी मागण्यांसाठी गणोरे ( अकोले ) येथे आज सोमवार दि १ जुलै पासून शुभम आंबरे व संदिप दराड यांनी आमरण उपोषणाला सुरवात केली

.यावेळी पंचक्रोशीतील सर्व दुध उत्पादक शेतकऱ्यांनी या अंदोलनात सहभागी होऊन पाठिंबा दिला
दुधाला प्रतिलिटर ४० रुपये बाजारभाव मिळावा,राज्यात दुध मुल्यआयोगाची स्थापना व्हावी,पशु खाद्याचे भाव कमी व्हावे,शासकिय अनुदानातुन पशु विमा योजना सुरु करावी, दुधाला उसा प्रमाणे एफ आर पी च्या धर्तीवर किमान रास्त व फायदेशीर दर देण्यात यावा, दुध व दुग्धजन्य पदार्थांची आयात बंद करुन निर्यातीला प्रोत्साहन मिळावे. अजित पवार यांनी अर्थ संकल्पात एक जुलै पासून दुधाला पाच रुपये अनुदान देण्याचे जाहिर केले आहे.परंतु केवळ दुधाला पाच रुपयाची भिक आम्हला नको आहे कयम स्वरुपी हमी भाव प्रती लिटर चाळीस रुपये मिळला पाहिजे.
यासाठी गणोरे येथे सकाळ पासून येथील बाजार तळावर दुध उत्पादक शेतकरी बेमुदत उपोषणाला बसले आहे तोडगा निघत नाही तो पर्यंत दुध उत्पादक शेतकरी उपोषण करणार आहे.

या उपोषणाला गणोरे पंचक्रोशीतील दुध उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पाठिंबा दर्शविला

उपोषण स्थळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष सुशांत आरोटे, सोमनाथ आहेर, पोपट आहेर, विवेक आंबरे, अंबादास दातीर, गोपाल दुध संस्थेचे अध्यक्ष अनिल आंबरे, संतोष उगले, गणोरेचे उपसरपंच प्रदिप भालेराव सुनिल उगले, डोंगरगांव चे सरपंच दशरथ उगले, उपसरपंच अमोल उगले, माजी सरपंच बाबासाहेब उगले, माजी उपसरपंच अशोक उगले, नाना नाईकवाडी, अमोल ठुबे, गोरख कदम,सोमनाथ बोंबले, संदिप रमेश वाकचौरे, मनसे तालुका अध्यक्ष दिपक वर्पे, तुकाराम गोर्डे, बाळासाहेब वाकचौरे, गणेश गोर्डे.रंगनाथ गोर्डे आदी उउपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button