इतर

आजचे पंचांग व राशिभविष्य दि.०५/०७/२०२४

🙏🙏 सुप्रभात 🙏🙏


🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- आषाढ १४ शके १९४६
दिनांक :- ०५/०७/२०२४,
वार :- भृगवासरे(शुक्रवार),
🌞सुर्योदय:- सकाळी ०५:५९,
🌞सुर्यास्त:- सांयकाळी ०७:०९,
शक :- १९४६
संवत्सर :- क्रोधी
अयन :- दक्षिणायन
ऋतु :- वर्षाऋतु
मास :- ज्येष्ठ
पक्ष :- कृष्णपक्ष
तिथी :- अमावास्या समाप्ति २८:२७,
नक्षत्र :- आर्द्रा समाप्ति २८:०६,
योग :- ध्रुव समाप्ति २७:४८,
करण :- चतुष्पाद समाप्ति १६:३९,
चंद्र राशि :- मिथुन,
रविराशि – नक्षत्र :- मिथुन – आर्द्रा,
गुरुराशि :- वृषभ,
शुक्रराशि :- मिथुन,
राशिप्रवेश :- राशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- अमावास्या वर्ज्य दिवस,

✿राहूकाळ:- सकाळी १०:५५ ते १२:३४ पर्यंत,

लाभदायक वेळा
लाभ मुहूर्त — सकाळी ०७:३८ ते ०९:१७ पर्यंत,
अमृत मुहूर्त — सकाळी ०९:१७ ते १०:५५ पर्यंत,
शुभ मुहूर्त — दुपारी १२:३४ ते ०२:१३ पर्यंत,

❀ दिन विशेष:
दर्श अमावास्या, पुनर्वसु रवि २३:४०, वाहन हत्ती, स्त्री.स्त्री.चं.चं., अन्वाधान,
————–


🐾🐾🐾🐾🐾🐾🐾🐾🐾
आजचा दिवस सुखाचा जावो मन प्रसन्न राहो!!!!!
💐🌺🌼🌹🌾🍀🌻🌷🌸

🌏 दैनिक राशीभविष्य 🌏


राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- आषाढ १४ शके १९४६
दिनांक = ०५/०७/२०२४
वार = भृगवासरे(शुक्रवार)

मेष
मानमरातब वाढेल. सामाजिक जाणीव ठेवून वागाल. मित्रांचे संपूर्ण सहकार्य लाभेल. वैवाहिक जीवन आनंदी राहील. आध्यात्मिक आवड वाढेल.

वृषभ
स्थावर मालमत्तेच्या कामातून लाभ होईल. घरात चांगल्या बातम्या येतील. तुमच्या पराक्रमात वाढ होईल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. इच्छापूर्तीचा दिवस.

मिथुन
दिवसाची सुरुवात आनंदी होईल. आज तुमच्या मनातील इच्छेला अधिक बळ मिळेल. अडचणीतून मार्ग निघेल. दिवस कार्यपूर्तीत जाईल. गोष्टी मनासारख्या घडून येतील.

कर्क
मानसिक चिंतेला बाजूला सारावे. स्वत:विषयीच्या चुकीच्या कल्पना कडून टाका. लपवाछपवीची कामे करू नका. बदलाची अपेक्षा कराल. अति उत्साह दाखवायला जाऊ नका.

सिंह
मनोवांच्छित लाभेल. चर्चेतून कोंडी फुटेल. वाहन जपून चालवावे. भविष्या संदर्भातील एखादी योजना आखाल. निराशेतून मार्ग काढाल.

कन्या
नवीन सोयी कराल. कामापेक्षा इतर गोष्टींकडे लक्ष जाईल. व्यापारीवर्ग खुश राहील. धावपळीतून यशाचा मार्ग खुला होईल. प्रलंबित कामे पूर्ण करावीत.

तूळ
नवीन गोष्टीत रमून जाल. व्यवहार सावधानतेने करावेत. तुमच्या मान सन्मानात वाढ होईल. मुलांकडून चांगल्या बातम्या मिळतील. कामात सुलभता येईल.

वृश्चिक
टोकाची भूमिका घेऊ नका. अचानक धनलाभ होऊ शकतो. शेअर्स च्या कामातून लाभ संभवतो. काही कामे कमी श्रमात पार पडतील. हातातील कामातून समाधान लाभेल.

धनू
आज जोडीदार तुमच्यावर खुश राहील. उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. भागीदाराशी सलोखा वाढेल. तुमचा आत्मविश्वास वाढीस लागेल. बोलण्यातील व्यर्थता टाळावी.

मकर
कामाच्या ठिकाणी प्रशंसा केली जाईल. हाताखालील लोक विश्वासू मिळतील. कामाचा उरक वाढेल. उगाच वादात पडू नका. भावनेच्या भरात निर्णय घेऊ नका.

कुंभ
आज दिवसभर मौजमजा कराल. मित्रांचा फड जमवण्याचा प्रयत्न कराल. करमणूक प्रधान दिवस राहील. मैत्रीचे संबंध अधिक घट्ट होतील. विनाकारण तर्क-वितर्क करू नका.

मीन
कौटुंबिक बाबीत यश मिळेल. घरात आनंदी वातावरण राहील. अनावश्यक खर्चात वाढ होण्याची शक्यता. हितशत्रू परास्त होतील. जोडीदाराच्या भावना समजून घ्या.

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button