इतर
शरद पवार गटाच्या तूतारीवर शिक्कामोर्तब !निवडणूक आयोगाची मान्यता;

मुंबई : राज्याच्या राजकारणाच्या दृष्टीने आज एक अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या मागणीला मान्यता दिली आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षाला तुतारी चिन्ह वापरण्यासही मान्यता मिळाली आहे. लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या पक्षाने तुतारी याच चिन्हावर निवडणुका लढल्या होत्या. आता याच चिन्हाचा उपयोग आगामी विधानसभा निवडणुकीत करण्यास मंजुरी मिळाली आहे. विधानसभा निवडणुकीआधी शरद पवार यांना ही मोठी गुडन्यूज मिळाली आहे.
शरद पवार यांच्या पक्षाला कलम 29 ब नुसार देणग्या देखील स्वीकारता येणार आहेत. देणगी स्वीकारण्यास मान्यता देण्यात आली आहे. या प्रकरणी आज निवडणूक आयोगासमोर सुनावणी झाली.