आजचे पंचांग व राशिभविष्य दि.११/०७/२०२४

🙏🙏 सुप्रभात 🙏🙏
🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- आषाढ २० शके १९४६
दिनांक :- ११/०७/२०२४,
वार :- बृहस्पतीवासरे(गुरुवार),
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:०१,
🌞सुर्यास्त:- सांयकाळी ०७:०८,
शक :- १९४६
संवत्सर :- क्रोधी
अयन :- दक्षिणायन
ऋतु :- वर्षाऋतु
मास :- आषाढ
पक्ष :- शुक्लपक्ष
तिथी :- पंचमी समाप्ति १०:४०,
नक्षत्र :- पूर्वा समाप्ति १३:०४,
योग :- वरीयान समाप्ति २८:०९,
करण :- कौलव समाप्ति २३:१७,
चंद्र राशि :- सिंह,(१९:४९नं. कन्या)
रविराशि – नक्षत्र :- मिथुन – पुनर्वसु,
गुरुराशि :- वृषभ,
शुक्रराशि :- कर्क,
राशिप्रवेश :- राशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- चांगला दिवस,
✿राहूकाळ:- दुपारी ०२:१३ ते ०३:५२ पर्यंत,
♦ लाभदायक वेळा
शुभ मुहूर्त — सकाळी ०६:०१ ते ०७:४० पर्यंत,
लाभ मुहूर्त — दुपारी १२:३५ ते ०२:१३ पर्यंत,
अमृत मुहूर्त — दुपारी ०२:१३ ते ०३:५२ पर्यंत,
शुभ मुहूर्त — संध्या. ०५:३० ते ०७:०८ पर्यंत,
❀ दिन विशेष:-
घबाड १३:०४ नं., दग्ध १०:०४ नं., षष्ठी श्राद्ध,
————–
🐾🐾🐾🐾🐾🐾🐾🐾🐾
आजचा दिवस सुखाचा जावो मन प्रसन्न राहो!!!!!
💐🌺🌼🌹🌾🍀🌻🌷🌸
🌏 दैनिक राशीभविष्य 🌏
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- आषाढ २० शके १९४६
दिनांक = ११/०७/२०२४
वार = बृहस्पतीवासरे(गुरुवार)
मेष
मन:स्वास्थ्य बिघडू देऊ नका. आजचा दिवस मध्यम फलदायी राहील. क्षुल्लक गोष्टींचा फार विचार करू नका. मुलांची काळजी लागून राहील. कौटुंबिक वातावरण उत्तम राहील.
वृषभ
ज्येष्ठ मंडळींची काळजी घ्यावी. आवडीची कामे करायला वेळ मिळेल. दिवसाची सुरुवात चांगली होईल. आपला मूड बिघडणार नाही याची काळजी घ्या.
मिथुन
अवास्तव चर्चा करू नका. सत्याची कास सोडू नका. मित्रांशी सुसंवाद साधावा. घरातील वातावरण हसते-खेळते ठेवाल. आपली हौस पूर्ण करून घ्याल.
कर्क
जोडीदाराच्या वर्तनाने ताण वाढू शकतो. सरसकट एकच विचार करू नका. हातातील कामात यश येईल. बदलांकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पहावे. भावंडांची उत्तम साथ मिळेल.
सिंह
बोलताना शब्दांचे वजन लक्षात घेऊन बोला. आपलेच मत खरे करायला जाऊ नका. कौटुंबिक सौख्य उत्तम राहील. आवडते पदार्थ खायला मिळतील. गोड बोलून कामे साध्य करता येतील.
कन्या
अनावश्यक खर्चाला आवर घालावी लागेल. कागदपत्रे नीट तपासून घ्यावीत. जोडीदाराची बाजू जाणून घ्यावी. अंगीभूत कलेचे कौतुक केले जाईल. दिवसाचा उत्तरार्ध मजेत जाईल.
तूळ
मानसिक तोल ढळू देऊ नका. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. कलेच्या क्षेत्रात काहीतरी नवीन शिकायला मिळेल. जोडीदाराच्या मताला पुष्टी द्याल. काही तडजोडी कराव्या लागतील.
वृश्चिक
मनातील इच्छेला अधिक प्राधान्य द्याल. कामात पळवाट शोधून चालणार नाही. दिवस संमिश्र राहील. पोटाच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. व्यसनाच्या आहारी जाऊ नका.
धनू
अनावश्यक सल्ले देऊ नका. मुलांच्या तक्रारी वाढू शकतात. त्यांची बाजू समजून घ्यावी लागेल. धार्मिक गोष्टींकडे ओढ वाढेल. जोडीदाराविषयी संभ्रम दूर होईल.
मकर
संपूर्ण माहितीशिवाय वक्तव्य करू नका. उगाच जुन्या गोष्टीत उकरून काढत बसू नका. योग्य आहार घ्यावा. घरातील गोष्टी संयमाने हाताळाव्यात. शक्यतो वादविवादात पडू नका.
कुंभ
नातेवाईकांचे प्रश्न सामोरे येतील. उष्णतेचे त्रास संभवतात. कामात किरकोळ समस्या जाणवू शकतात. मनाची द्विधावस्था होऊ शकते. अति विचार करू नका.
मीन
चेष्टा जपून करावी. वेळ पाळणे खूप गरजेचे आहे. कौटुंबिक घडी सांभाळावी. आर्थिक बाबीत आततायीपणे वागू नका. बोलताना भडक शब्दांचा वापर करू नका.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर