
महापारेषण आणि शेतकरी यांच्यातील वाद
सोनई प्रतिनिधी
नेवासा तालुक्यातील रांजणगाव येथील शेतकर्यांनी टाँवर कंपणीने शेतकर्यांची फसवणूक झाली म्हणून नेवासा तालुका शेतकरी संघटनेचे नेते ञिंबक रघुनाथ भदगले यांच्याकडे धाव घेऊन लेखी तक्रार दिल्याबरोबर शेतकरी संघटनेचे नेते अनिल घनवट यांच्याशी संपर्क करून तक्रारी अर्जानुसार
महापारेषण टाँवर उच्च वाहीनी कंपनी व शेतकरी यांच्यामधे पोलिस यंत्रणाने पोलिस बळ देऊन हस्तक्षेप करु नये असे प्रशासनाला लेखी निवेदन नेवासा तालुका शेतकरी संघटना अध्यक्ष ञिंबक भदगले, तालुका संपर्क प्रमुख ज्ञानेश्वर वाकचौरे व मनसेचे नेते दिगंबर पवार यांनी प्रशासनाला दिले, शेतकर्यांचा इच्छा नसल्यास कोणताही उपक्रम शेतीमधुन करता येणार नाही अशी कायदेशीर शासकीय परिपत्रकाचे निवेदन सोबत शेतकरी संघटनेचे कायदेशीर सल्लागार अँड-अजित काळे यांनी दिले
, अखेरीस शेतकरी संघटनेच्या दणक्याने सरकारला निर्णय घेण्यास भाग पाडले. रांजणगाव येथील शेतकर्यांची एकजुटीने व शेतकरी संघटनेच्या दणक्याने राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्णय घेऊन न्याय मिळवून दिला आहे.
शेतकरी संघटीत झाला तर शेतकर्यांच्या प्रश्न आपोआप सुटतील,काही प्रश्न, समस्या, अन्याय,असेल तर शेतकरी संघटना शी संपर्क करण्याचे आवाहन तालुका अध्यक्ष त्रिंबक भदगले यांनी केले आहे.