राजापूर च्या महाविद्यालय आठवणीत रंगला माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा …

संगमनेर दि 23
नूतन कला महाविद्यालय राजापूर ता संगमनेर येथे आज रविवार दिनांक 23 जुलै 2023 रोजी माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रागतीक शिक्षण संस्थेचे सेक्रेटरी ॲड. कैलास हासे उपस्थित होते तर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र वक्तृत्व परिषदेचे अध्यक्ष मा. प्रा. शिवराज आनंदकर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष निवडीची सूचना प्रा.सुभाष वर्पे यांनी केली. प्राचार्य डॉ. सुभाष कडलग यांनी आपल्या प्रास्ताविकातून विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयात उपलब्ध करून देण्यात आलेल्या विविध सुविधा आणि नॅक ची आवश्यकता ,व कोरोना नंतर ची महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची उपस्थिती बदल खंत व्यक्त केली.
प्रा. अमोल खरात यांनी अहवाल वाचन करताना सन 2002 पासून महाविद्यालयात होणारी प्रगती विशद केली तर प्रा. शितल वाळुंज यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. उपस्थित सर्व माजी विद्यार्थी आणि मान्यवरांचा महाविद्यालयाचा ‘प्राजक्त’ अंक देऊन सत्कार करण्यात आला.
माजी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना ते महाविद्यालयात असताना व आज झालेला बदल याबद्दल समाधान व्यक्त केले. महाविद्यालयाच्या प्रगतीसाठी माजी विद्यार्थी सर्व प्रकारचे सहकार्य करतील असे आश्वासन दिले. महाविद्यालयीन जीवनातील विविध आठवणींना उजाळा करून दिला तसेच महाविद्यालयात झालेला अमुलाग्र बदल बघून विद्यार्थी भारावूनच गेले. प्राचार्य डॉ सुभाष कडलग यांचे संस्थाचालकांनी केलेल्या मदतीचे कौतुक करून समाधान व्यक्त केले. महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी सध्या विविध क्षेत्रात नोकरी व्यवसाय करत असून त्यांनी महाविद्यालयातील प्राध्यापकांचे वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शनाबद्दल आभार मानले.
प्रमुख पाहुणे प्रा शिवराज आनंदकर यांनी. त्यांच्या जीवनात माजी विद्यार्थी मिळवला हजर राहता आले नाही पण या महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी बोलावल्याबद्दल ऋण व्यक्त केले.आपल्या मनोगतात विविध दाखले देत महाविद्यालयाच्या विकासासाठी माजी विद्यार्थ्यांची भूमिका कशी महत्त्वाची आहे हे समजावून सांगितले. तसेच संस्थेने महाविद्यालयाच्या विकासासाठी केलेले प्रयत्न आणि संस्थापकांचे योगदान याविषयी समाधान व्यक्त केले. माजी विद्यार्थ्यांनी मांडलेल्या मनोगतातील सूचनांचे कौतुक करून आपणही महाविद्यालयाच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी फुल ना फुलाची पाकळी म्हणून मदत कराल अशी अपेक्षा व्यक्त केली.
अध्यक्षीय मनोगतात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी प्राचार्य डॉ सुभाष कडलग आल्यापासून त्यांच्या प्रेरणेने महाविद्यालय प्रशासन कसे प्रयत्न करते याबद्दल सविस्तर माहिती दिली. आणि अजून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास करण्याचा आमचा माणस आहे, अशी अपेक्षा व्यक्त केली .सर्व कार्यक्रमाचे संपूर्ण सूत्रसंचालन विद्यार्थी विकास मंडळ अधिकारी प्रा. डॉ. प्रवीण आहेर व प्रा. अर्चना साबळे मॅडम यांनी केले.
सदर कार्यक्रमासाठी युवा वार्ता संपादक किसनराव हासे संस्थेचे अध्यक्ष , अॅड अनिल गोडसे साहेब सेक्रेटरी अॅड कैलासराव हासे, संस्थेचे सर्व संचालक मंडळ ,सर्व प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी वृंद, माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आभार प्रा.संतोष गोरडे यांनी मानले