रोटरी क्लब ऑफ नासिक च्या नूतन कार्यकारिणीचा रविवारी पदग्रहण सोहळा

नासिक – प्रतिनिधी
विविध स्तरांवर सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या रोटरी क्लब ऑफ नासिक या संस्थेच्या सन २०२४-२५ या कालावधीसाठी नूतन कार्यकारिणी निश्चीत करण्यात आली असून त्यांचा पदग्रहण सोहळा हा रविवार, दि.२१ जुलै, २०२४ रोजी सायंकाळी ६.३० वाजता गंगापूर रोड येथील के.बी.टी.कॉलेज च्या प्रशस्त सभागृहात पार पडणार आहे.
नूतन कार्यकारिणी मध्ये श्री.ओमप्रकाश रावत (अध्यक्ष) , सौ. शिल्पा पारख (सेक्रेटरी – ॲडमिन ), श्री.हेमराज राजपूत (सेक्रेटरी – प्रोजेक्ट) यांची सर्वानुमते निवड करण्यात आली असून यांचा शपथविधी सोहळा रोटरी क्लब चे विद्यमान डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रजिंदर खुराणा यांच्या शुभ हस्ते होणार आहे.
तसेच सदर पदग्रहण सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ च्या कुलगुरू लेफ्ट.जनरल माधुरी कानिटकर या देखील उपस्थित राहणार आहेत.
सदर पदग्रहण सोहळ्याप्रसंगी इतरही नवीन नियुक्ती झालेल्या रोटरी सभासदांचा शपथविधी होणार आहे.
सदर पदग्रहण सोहळ्याप्रसंगी जास्तीत जास्त रोटरी सभासद तसेच हितचिंतकांनी उपस्थित रहावे असे आवाहन सन २०२३-२४ चे अध्यक्ष श्री.मंगेश अपशंकर, सचिव डॉ.श्री.गौरव सामनेरकर , प्रोजेक्ट सचिव श्री.हेमराज राजपूत तसेच सर्व रोटरी क्लब ऑफ नासिक चे सर्व कार्यकारिणी यांनी केले आहे.