भारतीय मजदूर संघा च्या वर्धापन दिना निमित्ताने आरोग्य तपासणी शिबिर

पुणे दि 21 – 23 जुलै भारतीय मजदूर संघाच्या 69 व्या वर्धापन दिनानिमित्त भारतीय संरक्षण कामगार संघ ॲम्युनिशन फॅक्टरी खडकी च्या वतीने रेंजहिल्स येथे कामगारांच्या परिवारासाठी आरोग्य शिबीराचे आयोजन केले होते.
त्यात दंत चिकित्सा व नेत्र तपासणी करण्यात आली या कार्यक्रमाचे उद्घाटन अखिल भारतीय ठेका मजदूर संघाचे महामंत्री श्री.सचिन मेंगाळे यांच्या शुभहस्ते झाले
या वेळी पुणे जिल्हा मजदूर संघाचे संरक्षण चे प्रभारी गणेश टिंगरे, डॉ. सौ दिपाली पाटेकर साई पाटेकर डेंटल क्लिनिक आणि डॉ.माळवदेकर डॉ. आगरवाल आय हॉस्पिटल यांच्या सहकार्याने तसेच संघटनेचे अध्यक्ष श्री राम चौधरी सरचिटणीस श्री संदीप वाळके यांच्या उपस्थितीत मध्ये कार्यक्रम संपन्न झाला .
सचिन मेंगाळे यांनी भारतीय मजदूर संघाच्या कार्या विषय मार्गदर्शन केले , तसेच कामगारांच्या पुढील आव्हानात्मक परिस्थिती च्या पार्श्वभूमीवर भारतीय मजदूर संघ च्या झेंडया खाली एकत्रित यावे असे आवहान केले आहे.
डाॅ दिपाली पाटेकर यांनी मौखीक आरोग्या विषयांवर सविस्तर अशी माहिती दिली. सर्वांनी आपल्या दैनंदिन जीवनात कशी काळजी घ्यावी माहिती दिली .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री अरविंद गायकवाड यांनी केले तर प्रास्ताविक श्री गणेश टिंगरे यांनी केले व आभार प्रदर्शन श्री नवनाथ गुंजाळ यांनी केले या आरोग्य शिबीराच्या लाभ दोनशे पेक्षा जास्त परिवारांनी घेतला.
तसेच भारतीय मजदूर संघ च्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने होणारे कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे.
