अक्षदा मंगल कलशाचे अकोले शहरात भव्य स्वागत

अकोले प्रतिनिधी –
२२ जानेवारीला अयोध्येत नवनिर्मित भव्य मंदिरात भगवान प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. त्यानिमित्ताने घरोघरी निमंत्रण देण्यासाठी अयोध्या येथून आलेल्या अक्षदा व मंगल कलशांचे शुक्रवार दि. 22 डिसेंबर रोजी दुपारी 2 वाजता अकोले शहरात मा.आ.वैभवराव पिचड यांच्या प्रमुख उपस्थित उत्साहात स्वागत करण्यात आले.
यावेळी योगी केशव बाबा चौधरी, ह. भ. प. विवेक महाराज केदार,उदासी मठाचे महाराज,विश्वहिंदू परिषदेचे जिल्हा कार्यवाह बापू टेके, सह कार्यवाह दिपक जोंधळे, जन जाती कल्याण आश्रम चे अध्यक्ष बाळासाहेब मुळे,बजरंग दलाचे राहुल ढोक,जिल्हा सरचिटणीस सीताराम भांगरे,तालुकाध्यक्ष यशवंतराव आभाळे,सरचिटणीस राहुल देशमुख,जिल्हा उपाध्यक्ष गिरजाजी जाधव, अमृतसागर दूध संघांचे व्हा. चेअरमन रावसाहेब वाकचौरे, जिल्हा अभियंता सेल चे जिल्हाध्यक्ष सुनील दातीर, अकोले तालुका एज्युकेशन सोसायटी चे सेक्रेटरी सुधाकर देशमुख,धनंजय संत,तालुका सरचिटणीस मच्छिन्द्र मंडलिक, सचिन जोशी, रोहिदास धुमाळ, नगराध्यक्ष बाळासाहेब वडजे, उप नगराध्यक्ष शरद नवले,माजी नगराध्यक्ष सौ. सोनाली नाईकवाडी,संदीपराव शेटे, भाऊ मामा खरात, शिवाजी अरज,डॉ. उमा कुलकर्णी, सौ. वैशाली जाधव, रमेश राक्षे, भाऊसाहेब कासार, नगरसेवक सौ. शीतल वैद्य, सौ. प्रतिभा मनकर, सौ. कविता शेळके,सौ. जनाबाई मोहिते, माधुरी शेणकर,सौ. वैष्णवी धुमाळ, सौ. अंजली सोमणी,सौ. सीताबाई गोंदके,माधवराव तिटमे, संजय हुजबंद,अशोक आवारी, बबलू वाकचौरे,प्रतीक वाकचौरे, हर्षदीप डावरे, गोकुळ वाघ,नगरसेवक, आदिसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
प्रभू श्रीरामांची भव्य मूर्ती, वारकरी दिंडी, अगस्ती विद्यालयाचे ढोल पथक,पारंपरिक वाद्यांचा गजर आणि ‘जय श्रीराम’ असा जयघोष करत दुपारी 2 वाजता सर्व प्रथम बुब यांचे श्रीराम मंदीर येथे विधिवत पूजा करुन महाआरती झाली. त्यानंतर भव्य शोभायात्रेला सुरुवात झाली. फुलांनी सजविलेल्या रथात अयोध्येहुन आलेल्या अक्षदा व मंगल कलश विधिवत पूजा करीत सर्वसामान्य नागरिक आणि रामभक्तांच्या उपस्थित पुष्पवृष्टी करून ठेवण्यात आले. अक्षदा व मंगल कलशाचे ठिकठिकाणी भाविकांनी दर्शन घेत स्वागत केले. हा सोहळा पाहण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने आले होते. चौकाचौकात मंगल कलशांचे पूजन करण्यात आले. त्यावर पुष्पवृष्टी करण्यात येत होती. सर्वत्र फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.

शोभायात्रा अगस्ती विद्यालय पासून सुरु होऊन बाजारपेठ, अगस्ती थियेटर, शिवाजी चौक, महात्मा फुले चौक मार्गे ते बस स्थानक येथे येऊन शोभा यात्रेची सांगता झाली.
यावेळी २२ जानेवारीला अयोध्येत होत असलेल्या कार्यक्रमासाठी अकोले शहरासह तालुक्यातुन मोठ्या संख्येने भाविक जाणार आसल्याचा विश्वास मा.आ.वैभवराव पिचड यांनी व्यक्त केला.
याप्रसंगी विश्व हिंदू परिषद ,बजरंग दल,सकल हिंदु समाज तसेच स्थानिक सर्वपक्षीय राजकीय व संस्थाचे पदाधिकारी, श्रीरामभक्त, ग्रामीण भागासह अकोले शहरातील नागरिक,मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
.