राज्यपालांच्या हस्ते पद्मश्री राहीबाई पोपरे यांना राज्यस्तरीय जिजामाता कृषीभूषण पुरस्कार प्रदान!

अकोले /प्रतिनिधी
महाराष्ट्र शासन कृषी विभागातर्फे दिला जाणारा राज्यस्तरीय जिजामाता कृषी भूषण पुरस्कार। पद्मश्री राहीबाई सोमा पोपरे यांना
नुकताच प्रदान करण्यात आला.
राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांचे हस्ते नाशिक येथे हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला.यावेळी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार , विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ महसूल मंत्री बाळासाहेब थोरात कृषी मंत्री दादा भुसे पालकमंत्री छगन भुजबळ, कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम आदी मान्यवर उपस्थित होते.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी शेतकरी सन्मानाचे कौतुक करताना म्हणाले की. शेतकर्यांनी काबाड कष्ट करून अन्नधान्य आयात करण्याची गरज ठेवली नाही त्यांचे मी कौतुक करतो. सेंद्रिय शेती करण्याचे त्यांनी गरज व्यक्त केली. उत्तराखंड येथील माझ्या राज्यातील शेतकरी मी इकडील शेती दाखवण्यास आणतो, कारण महाराष्ट्र राज्य देशातील शेतीसाठी उत्कृष्ठ राज्य आहे. उत्तम शेती फक्त महाराष्ट्रातच होवू शकते, याचा गौरव त्यांनी याप्रसंगी केला.
दूरभाष्य प्रणाली द्वारे मार्गदर्शन करताना राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राहीबाई यांच्या कार्याचा गौरव केला त्यांनी निर्माण केलेल्या गावरान बियाणे बँकेचा उल्लेख करत अभिनंदन केले. शेतकरी केंद्रस्थानी ठेवून काम करण्यासाठी या पुरस्काराची रक्कम वाढवणार असल्याचे नमूद केले. महिला शेतकरी भगिनींना कृषी योजनांमध्ये पन्नास टक्के राखीव ठेवणार असल्याची घोषणा त्यांनी केली.