करीर ,देशमुख, चौधरी या भूमी पुत्रांचा उद्या अकोल्यात सन्मान सोहळा !

अकोले, प्रतिनिधी
–
अहमदनगर जिल्ह्याचे सुपुत्र व महाराष्ट्र राज्याचे सेवानिवृत्त मुख्य सचिव नितिन करीर यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा व अकोले तालुक्याचे भूमिपूत्र अजित देशमुख, विजय चौधरी यांची सहसचिवपदी पदोन्नती झाल्याबद्दल विशेष सन्मान सोहळा अकोल्यात आयोजित केला आहे
राज्याचे माजी मंत्री मधुकरराव पिचड यांचे अध्यक्षतेखाली व आ. डॉ. किरण लहामटे यांचे हस्ते दि. ३ ऑगस्ट रोजी स. ११ वा मातोश्री लॉन्स अकोले येथे हा कार्यक्रम पार पडत आहे राज्याचे मुख्य सचिव म्हणून काम पाहत सेवानिवृत्त झालेले नितीन करीर यांच्या सेवापूर्ती निमित्ताने तर तालुक्याचे भुमिपूत्र व मंत्रालयात कार्यरत असलेले अव्वर सचिव अजित देशमुख व विजय चौधरी यांची नुकतीच सहसचिव पदी पदोन्नती झाल्याने त्यांचा सत्कार ही अकोले तालुक्यात होत आहे.
यावेळी जिल्हाधिकारी सिद्धराम सालिमठ, आ.सत्यजित तांबे, अगस्ती कारखान्याचे चेअरमन सीताराम गायकर, विकास देशमुख (भा.प्र.से), निर्मलकुमार (भा.प्र.से), सतीश देशमुख (भा.प्र.से), ज्येष्ठ नेते दशरथ सावंत, मधुकरराव नवले, लिज्जत पापडचे कार्यकारी संचालक सुरेशराव कोते यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न होणार आहे.
या सोहळ्यास जास्तीत – जास्त लोकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन शांताराम चौधरी, किसन चौधरी , शरद चौधरी, विवेक देशमुख, संदीप देशमुख, मनोज देशमुख यांनी केले आहे
———–