चाईल्ड केअर तर्फे उरण तालुक्यात 40+आरोग्य चषक स्पर्धा संपन्न

हेमंत देशमुख
उरण/ रायगड
चाईल्ड केअर सामाजिक संस्था उरण रायगड चे संस्थापक, अध्यक्ष -श्री विकास कडू यांच्या मार्गदर्शना खाली उरण तालुक्यात 40+आरोग्य चषक चे आयोजन करण्यात आल्या होत्या
या स्पर्धेचे उदघाटन श्री मनोज भगत(अध्यक्ष -उरण राष्ट्रवादी )यांच्या शुभ हस्ते करण्यात आले तर प्रमुख पाहुणे म्हणून कुणाल पाटील (उपाध्यक्ष -वाहतूक सेना), विवेक पाटील -(अध्यक्ष जाणता राजा प्रतिष्ठान,) अविनाश शेठ (मा उपसरपंच पागोटे,) किशोर कडू (सोनारी), दिनेश ठाकूर (करळ,) जगदीश म्हात्रे (भेंडखळ) संदीप पाटील पागोटे,
चाईल्ड केअर संस्थेचे संस्थापक- श्री विकास कडू, उपाध्यक्ष -तुषार ठाकूर, उपाध्यक्ष -राजेश ठाकूर, मनोज ठाकूर सदस्य -रोशन धुमाळ, विपुल कडू, विवेक कडू हे उपस्थित होते
चाईल्ड केअर सामाजिक संस्थेतर्फे 40+आरोग्य चषक घेण्यात आल्या त्यात अंतिम फेरीत जितू स्पोर्ट 40+करळ आणी फ्रेंड्स 40+सोनारी या संघानी मजल मारली, त्यात फ्रेंड्स 40+संघ सोनारी या संघानी 40+आरोग्य चषक 2022 प्रथम क्रमांक पटकावला तर दुसरा क्रमांक जितू स्पोर्ट 40+करळ संघानी पटकावला
त्यात उत्कृष्ट फलंदाज जयवन्त तांडेल (करळ)
उत्कृष्ट गोलन्दाज प्रमोद कडू (सोनारी )
उत्कुष्ट श्रेत्ररक्षक हिराचंद्र तांडेल (करळ)
मालिकावीर जितू कडू (सोनारी ) यांना सम्मानित करण्यात आले
प्रमुख पाहुणे मनोज भगत या वेळी बोलताना म्हणाले कि चाईल्ड केअर संस्थेने या स्पर्धा भरवून 40+उरण ला एक नव संजीवनी दिली या बद्दल संस्थेचे संस्थापक विकास कडू आणि सर्व टीम चे अभिनंदन या पुढे दर वर्षी अशा स्पर्धा भरविण्यात याव्यात असे ते म्हणाले
कुणाल पाटील म्हणले कि या स्पर्धेमध्ये मला प्रमुख पाहुणे म्हणून बोलावले हे माझे भाग्य समजतो
तर उरण मधील सुप्रसिद्ध निवेदक आपले मनोगत मांडताना म्हणाले कि चाईल्ड केअर संस्थेने जो आरोग्य चषक आयोजित केले आहे ते संपूर्ण उरण तालुक्यासाठी खूप मह्त्वाचे आहे. स्पर्धेच्या माध्यमातून आरोग्य च्या कडे लक्ष द्या हे सांगणारे ब्रीद वाक्य सांगणारे श्री विकास कडू यांचे खरोखर करावे तितके कमी आहे
तर स्पर्धेचे आयोजक श्री विकास कडू यांनी आपले मनोगत मांडताना ही स्पर्धा फक्त निमित्य आहे 40+ नंतर लोक घरी बसतात जास्त शरीराची हालचाल करत नाहीत परंतु उरण उलवे नोड 40+असो. जे काय संपूर्ण उरण उलवे नोडपरिसरात जी काय स्पर्धा भरवतात त्याला प्रतिसाद म्हणून संपूर्ण उरण तालुक्यातील खेळाडू सहभाग घेऊन एक धाव आरोग्य साठी हे ब्रीद वाक्य बनवले आहे त्या साठी मी संस्थेच्या वतीने खूप खूप धन्यवाद
स्पर्धेच्या विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले तर स्पर्धेचे समालोचक मनोज तांडेल (सोनारी ), संस्थेचे उपाध्यक्ष तुषार ठाकूर यांनी आभार मानले