नेप्तीत रंगलेल्या हरिनाम सप्ताहाची रविवारी सांगता

दररोज हजारो भाविकांना अन्नदान
अहमदनगर /प्रतिनिधी-
नेप्ती (ता. नगर) परिसरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या अनुलेश्वर मंदिराच्या प्रांगणात सुरु असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाचा कार्यक्रम रोज रंगत असून, दररोज हजारो भाविकांची हजेरी लागत आहे. या हरिनाम सप्ताहाची सांगता रविवारी (दि.13 नोव्हेंबर) ह.भ.प. श्रीनिवास घुगे महाराज (आळंदी देवाची) यांच्या काल्याच्या किर्तनाने होणार आहे.
काल्याचे किर्तन सकाळी 9:30 ते 11:30 या वेळेत होणार असून, या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन नेप्ती ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे. 6 नोव्हेंबरला कलश स्थापना होऊन अखंड हरिनाम सप्ताहाची सुरुवात झाली होती. महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाची परंपरा जोपासून पूर्वी काळापासून या अखंड हरिनाम सप्ताहाचे नेप्ती ग्रामस्थ आयोजन करत असतात. यामध्ये रोज पहाटे काकडा , सकाळी गाथा भजन, संध्याकाळी हरिपाठ, रात्री किर्तन, भोजन व त्यानंतर हरीजागर आदी धार्मिक कार्यक्रमाचाह समावेश आहे. या सप्ताहात हजारोच्या संख्यने उपस्थित राहणार्या भाविकांना दररोज भंडार्याचे वाटप केले जात आहे.
या सप्ताहाची सुरुवात ह.भ.प. अक्षय उगले महाराज (जेऊर हैबती, नेवासा) यांच्या किर्तनेने झाली. तर सांगता ह.भ.प. श्रीनिवास घुगे महाराज यांच्या काल्याच्या किर्तनाने होणार आहे. तर किर्तनानंतर भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी परिसरातील भाविकांनी देवदर्शन व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आव्हान सरपंच सुधाकर कदम , उपसरपंच जालिंदर शिंदे व ग्रामस्थांनी केले आहे .या सप्ताहात ह.भ.प. विठ्ठल महाराज फलके व विद्यार्थी नवनाथ वारकरी शिक्षण संस्था (निमगाव वाघा) यांची साथ संगत लाभत आहे. तर सहकार्य युवा किर्तनकार शिवव्याख्याते आकाश महाराज फुले, श्रीनिवास महाराज जपकर, सचिन महाराज जपकर यांचे लाभत आहे.

महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी परिसरातील भाविकांनी देवदर्शन व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आव्हान सरपंच सुधाकर कदम , उपसरपंच जालिंदर शिंदे व ग्रामस्थांनी केले आहे .या सप्ताहात ह.भ.प. विठ्ठल महाराज फलके व विद्यार्थी नवनाथ वारकरी शिक्षण संस्था (निमगाव वाघा) यांची साथ संगत लाभत आहे. तर सहकार्य युवा किर्तनकार शिवव्याख्याते आकाश महाराज फुले, श्रीनिवास महाराज जपकर, सचिन महाराज जपकर यांचे लाभत आहे.

……….