पोलीस आणि जनतेचा सलोखा हाच कायदा व सुव्यवस्थेचा दुवा. -श्री हरिष बैजल

नाशिक प्रतिनिधी
रोटरी क्लब ऑफ नासिक तर्फे श्री हरिष बैजल ह्यांच्याशी संवाद साधण्याची संधी नाशिककराना मिळाली.
रोटरी हॉल येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात माजी अध्यक्ष डॉक्टर सौ श्रीया कुलकर्णी यांनी घेतलेली श्री हरीष बैजल यांची प्रकट मुलाखत खूपच यशस्वी ठरली.
श्री बैजल यांनी पोलिसांसंबंधी असलेल्या कित्येक गैरसमजांवर भाष्य केले .
पोलीस आणि जनता एकमेकांना पूरक असून दोघांचे संबंध सलोख्याचे राहिल्यास कायदा व सुव्यवस्थेसंबंधीची अडचण आपोआपच नाहीशी होईल, असे त्यांनी प्रतिपादित केले.
श्री हरिष बैजल ह्यानी उपस्थित रोटरी सदस्य व प्रेक्षक ह्यानी विचारलेल्या प्रश्नांची समर्पक उत्तरे दिलीत .तसेच सामान्य नागरिकाना असलेल्या विवध शंकांचे समाधान आपल्या प्रदीर्घ सेवेच्या अनुभवातून विवध घटना व उदाहरणे देवून केले.
आपल्या कारकिर्दीत यशाचे शिखर गाठलेले व उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचे हरीश बैजल किती विनम्र आणि हळवे आहेत याचा प्रत्यय मुलाखतीतून आला. डॉक्टर श्रीया कुलकर्णी यांनी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू आपल्या मुलाखतीतून उलगडून दाखवले.

ह्यावेळी रोटरी क्लब ऑफ नासिक चे अध्यक्ष. श्री ओमप्रकाश रावत ह्यानी आपले मनोगत व्यक्त केले . असिस्टंट गव्हर्नर श्री. ओंकार महाले ह्यानी कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली.
कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी प्रोग्राम कमिटी चेअरमन दमयंती बार्डिया , मंथ डायरेक्टर उन्मेश देशमुख, मंथ लीडर अनुजा चौघुले व सलील केळकर ह्यानी प्रयत्न केले.
डॉ. वसंतराव पवार मेडिकल कॉलेज अँड रिसर्च सेंटर नाशिक च्या रोट्रॅक्ट क्लब तर्फे ओंकार होले, अदिती मोगल, अभिषेक गोचडे आणि निकांशा पुरोहित ह्यानी अवयव दानाबद्दल माहिती दिली.
कार्यक्रमास अनिल सुकेणकर, दिलीपसिंग बेनिवाल ,मंगेश अपशंकर, मुग्धा लेले, स्मिता अपशंकर, विनायक देवधर, उर्मी दिनानी आणि डॉ. नेहा विधाते उपस्थित होते.
सचिव सौ शिल्पा पारख ह्यानी आभार प्रदर्शन केले व पुढील नियोजित कार्यक्रमांची माहिती दिली.