नाशिक प्रतिनीधी
नाशिकच्या जवळपास 160 शाळांमध्ये कार्यान्वित असलेल्या रोटरी इंटरॅक्ट क्लब पदाधिकाऱ्यांचा सामूहिक पदग्रहण सोहळा नुकताच रोटरी हॉल येथे पार पडला. इंटरॅक्ट क्लब मध्ये बारा ते अठरा वयोगटातील विद्यार्थ्यांचा समावेश असतो. समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून भोंसला मिलिटरी स्कूलचे कमांडंट कर्नल संदीप पुरी उपस्थित होते.
रोटे दमयंती बरडिया यांच्या गुरुवंदनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. याप्रसंगी क्लब प्रेसिडेंट ओमप्रकाश रावत यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले व त्यांना प्लास्टिक निर्मूलन, वाहतूक नियमन आणि उद्यमशीलतेशी संबंधित प्रकल्पांवर भर देण्यास सांगितले. इंटरॅक्ट क्लबच्या सर्व विद्यार्थी पदाधिकाऱ्यांना क्लबचे अध्यक्ष ओमप्रकाश रावत आणि सेक्रेटरी शिल्पा पारख यांच्या हस्ते रोटरी पिन प्रदान करण्यात आल्या. इंटरनेट डायरेक्टर अदिती अग्रवाल यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना शपथ दिली व त्यांना पदाच्या जवाबदारीची जाणिव करुन दिली. इंटरॅक्ट क्लबच्या अंतर्गत होणाऱ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमधील नेतृत्व गुण व व्यवस्थापन कौशल्याचा विकास होतो. प्रमुख पाहुणे कर्नल संदीप पुरी यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांना लष्करी सेवेत शामिल होण्याचे आवाहन केले. त्यांनी सांगितले की युवकांसाठी लष्करामध्ये अनेक संधी उपलब्ध आहेत, त्यांनी दृकश्राव्य प्रेझेंटेशनच्या माध्यमातून लष्करातील एअर फोर्स ,आर्मी आणि नेव्ही संबंधित माहिती दिली आणि उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्नांची समर्पक उत्तरे दिली. याप्रसंगी नुकताच गिर्यारोहण प्रशिक्षण घेतलेल्या ध्रुव बालाजी वाले व रोटरी युथ एक्सचेंज अंतर्गत अमेरिकेला जाऊन आलेल्या अक्षय कुलकर्णी यांचा सत्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला.
रोटे राजेश्वरी बालाजी वाले यांनी सूत्रसंचालन केले. क्लब सेक्रेटरी शिल्पा पारख यांनी आगामी कार्यक्रमांची माहिती दिली व आभार मानले.


कार्यक्रमाचे उत्तम नियोजन इंटरएक्ट क्लब संचालक अदिती अग्रवाल ,वंदना सम्मनवार, डॉ हितेश बुरड ह्यानी केले.
डॉ सुप्रिया मंगळूरकर, सुचिता महादेवकर, दमयंती बरडिया, मोना सामनेरकर ,वैशाली रावत यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली.
ह्या सोहळ्यास डॉ गौरव सामनेरकर ,दिलीपसिंग बेनिवाल,मुग्धा लेले,विनायक देवधर,सुहास कुलकर्णी, अमित चौघुले,उर्मिला देवधर तसेच विद्यार्थी व शिक्षक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.