इंजिनियर स्वप्निल आग्रे वर गोळीबार हल्लेखोरांना कडक शिक्षा व्हावी : सरपंच संतोष मोरे

पारनेरप्रतिनिधी
मंगळवार दिनांक २७ सप्टेंबर २२ रोजी मांडओहोळ रोडवर परप्रांतीय हल्लेखोरांनी शासकीय कामे करणाऱ्या ठेकेदार इंजिनियर स्वप्निल जयसिंग आग्रे याच्यावर चार गोळ्या झाडल्या असून यामध्ये ठेकेदार स्वप्निल आग्रे हे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर नगर येथील खाजगी रुग्णालय श्रीदीप हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहे सदर ठेकेदाराची परिस्थिती गंभीर असल्याने गुन्हेगारी स्वरूपातील परप्रांतीय लोके तालुक्यामध्ये राजरोसपणे राहतात त्यांच्यावरती कडक कारवाई व्हावी अशी मागणी वारणवाडीचे सरपंच संतोष मोरे व पोखरी सोसायटी मा. चेअरमन अण्णा पवार यांनी केली आहे.
हल्लेखोरांनी ठेकेदार स्वप्निल आग्रे याच्यावर हल्ला केल्यानंतर काही वेळातच दाखल झालेले गोविंद आग्रे यांनी सांगितलेले माहितीनुसार ते त्यांच्या खाजगी कामासाठी टाकळी ढोकेश्वर येथे जात असताना साधारण १ वाजून २२ मिनिटांनी घटना घडली असावी मी १ वाजून २५ मिनिटात घटनास्थळी रोडला आलो होतो मी टाकळी ढोकेश्वर ला जात असताना घटना स्थळापासून काही मिनिटांनी मला स्वप्निलची गाडी जोरात जाताना दिसली पुढे आल्यावर स्वप्निल रस्त्यावर पडलेला आढळून आल्यावर मी त्याला उचलून मांडीवर डोके घेतले त्याचे संपुर्ण शरीर रक्ताने माखलेले होते त्यावेळी तो बोलत होता त्याने मला गोळ्या घातल्याची माहिती दिली नंतर मी पोखरीकडील काही लोकांना फोन केले. इतक्याच कन्हेर, गाढवेझाप येथील अनिल आहेर तेथे रस्त्याने येत होते लगेच त्यांनी डॉ. प्रदीप दाते यांना फोन करून घटनेची माहिती दिली. तेवढ्यात त्यांना समोरून टाकळी कडे जाताना चार चाकी वाहन आलेले दिसले आम्ही दोघांनी सदर वाहन थांबून स्वप्निल ला गाडीत घेतले व मी टाकळी ढोकेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात आलो तेथे डॉ. प्रदीप दाते यांनी व तेथील स्टाफ यांनी प्रथमोपचार करून ॶॅब्युलसची व्यवस्था केली. नंतर ग्रामीण रुग्णालयातून लगेच डॉ. प्रदीप दाते, ॶॅब्युलन्स स्टाप व मी नगर येथे खाजगी रुग्णालय श्रीदीप हॉस्पिटल ला घेऊन गेलो या दरम्यान सभापती दाते सरांना फोनवर माहिती दिली गेली होती सरांनी लगेच टाकळी ढोकेश्वर पोलीस स्टेशन गाठले व घटनेची माहिती पारनेर पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांना दिली व तातडीने कारवाई करण्यास सांगितले नंतर सभापती दाते सर नगर येथील श्रीदीप हॉस्पिटलला दाखल झाले व रात्री साडेअकरा वाजेपर्यंत सभापती दाते सर हॉस्पिटलला थांबून होते व श्रीदीप हॉस्पिटलच्या डॉक्टर टीम बरोबर संपर्कात होते टाकळी ढोकेश्वर मध्ये प्रकाश घाडगे, अनिल आहेर, बाबाजी लांडगे, संकेत, ॶॅब्युलन्स ड्रायव्हर भिमा हिंगडे, सुरज वैराळ, संकेत गुळवे यांनी सहकार्य केले ची माहिती गोविंद आग्रे यांनी दिली पुढील तपास पारनेर पोलीस स्टेशनचे पीआय घनश्याम बळप करत आहेत
: टाकळी ढोकेश्वर ग्रामीण रुग्णालयातून २६ मिनिटात नगर येथील श्रीदिप हॉस्पिटल मध्ये दाखल झालो, डॉ. अमिल बडवे, डॉ. खरचे, डॉ. विश्वजीत पवार यांच्या टीमने तातडीने ऑपरेशनची तयारी केली, चार गोळ्या लागल्या होत्या तीन पोटात व एक हाताला लागली होती या डॉक्टरांनी चार तास शर्थीचे प्रयत्न करुन यशस्वी शस्त्रक्रिया केली असून पेशंट प्रकृती गंभीर आहे मी आणि सभापती दाते सर ऑपरेशन होईपर्यंत हॉस्पिटलला होतो
: डॉ. प्रदीप दाते