शंकर गायकर यांची विश्व हिंदू परिषद राष्ट्रीय प्रवक्ते पदी निवड!

अकोले प्रतिनिधी
अकोले (जि.नगर) तालुक्याचे भूमिपुत्र विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय सहमंत्री शंकर गायकर यांनी परिषदेच्या राष्ट्रीय प्रवक्ते पदी निवड करण्यात आली.
२७ व २८ जुलै २०२४ रोजी जोधपुर (राजस्थान) या ठिकाणी विश्व हिंदू परिषदेची केंद्रीय प्रबंध समितीची बैठक पार पडली त्यात राष्ट्रीय सहमंत्री शंकर गायकर यांना हे अतिरिक्त दायित्व सोपविण्यात आले.
श्री.गायकर यांच्या बरोबर श्री.अमरीश(नवी दिल्ली),श्री,शशिधर(भाग्यनगर, हैद्राबाद), श्री.अमितोष परीख(जयपुर) यांची सह-प्रवक्ते म्हणून निवड करण्यात आली.
०५ ऑगस्ट रोजी विश्व हिंदू परिषदेच्या वतीने राष्ट्रीय प्रवक्ते श्री.विनोद बन्सल यांनी या नावांची घोषणा नवी दिल्ली येथे केली.
शंकर गायकर हे मूळ अकोले तालुक्यातील ब्राम्हणवाडा गावचे रहिवासी असून यापूर्वी संघ प्रचारक बजरंग दलाचे महाराष्ट राज्य प्रमुख ,क्षेत्र प्रमुख विश्व हिंदू परिषदेचे क्षेत्रीय व राष्ट्रीय सहमंत्री म्हणून संघटनेत विविध पदावर काम केलेले आहे.