सोलापूर

महिलांसाठी पद्मशाली सखी संघम तर्फे ‘मंगळागौर’चे मोफत प्रशिक्षण !

सोलापूर : ‘मंगळागौर’चे खेळ सुहासिनींच्या घरी रंगू लागतात. नवीन लग्न झालेल्या मुलींची ‘मंगळागौर’ही श्रावण महिन्यात मंगळवारी साजरा केला जातो. पूर्वजांनी अतिशय कल्पकतेने धार्मिकतेशी संबंध जोडून महिलांच्या कला – गुणांना, कुटुंबातील सदस्यांच्या सुखसमृध्दी व दीर्घायुष्यासाठी आणि मुख्य उद्देश रिलॅक्स होण्यासाठी या सणांची योजना केली आहे. सोलापूरातील श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशन संचलित पद्मशाली सखी संघमच्या वतीने पद्मशाली समाजाचे कुलदैवत भगवान चिरंजीव महर्षी मार्कंडेय महामुनींचे मंदिराच्या शतक महोत्सवानिमित्त सर्व समाजातील ‘महिलांना’ विनामूल्य (नि:शुल्क) प्रशिक्षण देण्यात येणार आहे, अशी माहिती सखी संघमच्या अध्यक्ष मेघा इट्टम व सचिव पूजा चिप्पा यांनी दिले आहे.

रविवार, दि. १८ ऑगस्ट रोजी पूर्व भागातील जुना विडी घरकुल येथील, ‘बी ग्रुप’ मधील श्री श्री रविशंकर समाज मंदिरात सकाळी ११.०० वाजता प्रशिक्षणास प्रारंभ होईल. ‘मंगळागौर’च्या खेळांचे प्रशिक्षण वर्गात पिंगा.. झिम्मा.. फुगडी.. आदी विविध प्रकारांचे खेळ शिकवण्यात येणार आहे. याचे प्रशिक्षण जयश्री महामुनी, मनोरंजना मोरे, मयुरा पोतदार, संजीवनी कुलकर्णी ह्या देणार आहेत.

हा खेळ खेळल्याने शरीराला एक प्रकारे व्यायाम व फायदा होतो. शहरातील पूर्व भागातील महिलांना पहिल्यांदाच संधी प्राप्त करुन देण्यात येत असून जास्तीत जास्त महिलांनी सहभागी व्हावेत असे आवाहन उपाध्यक्ष – मंजुळा आडम – कल्याणी पेनगोंडा, सहसचिव – लक्ष्मी कोडम, खजिनदार – आरती बुधाराम, सहखजिनदार – विद्या सिंगम, कार्याध्यक्षा – अन्नपूर्णा सोमा, सहकार्याध्यक्षा – आरती आडम, समन्वयिका – गीता भूदत्त – कला चन्नापट्टण, मार्गदर्शिका – प्रा. सपना मिठ्ठापल्ली, सल्लागार – ममता मुदगुंडी – सीमा यलगुलवार. कार्यकारिणी सदस्या वनिता सुरम, ॲड. मेघना मलपेद्दी, भाग्यश्री मडूर, हेमा मैलारी, पद्मा मेडपल्ली, पल्लवी संगा, सुनिता दारा, सविता अंबाल, मीना कंदीकटला, अनिता कोंका, सुजाता इंदापूरे, विद्या श्रीगादी, सोनाली तुम्मा, सुनिता निलम (क्यामा), विद्या मुशन, दिव्यांजली आरकाल, श्वेता वल्लाल, ज्योती दासरी, राजेश्वरी बल्ला, नम्रता दुडम, अनुराधा बुरा, नेहा दासरी, ललिता चिंतमपल्ली, लता दुधगुंडी, पल्लवी सादूल, कल्पना दिकोंडा यांनी केले आहे.
—————————-
नवीन नांवनोंदणी करण्यासाठी संधी देण्यात येत आहे त्यासाठी अध्यक्ष मेघा इट्टम यांच्या +919370454549 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावेत तसेच अधिक माहितीसाठी वरील क्रमांकाशी संपर्क साधावे असे संस्थापक गौरीशंकर कोंडा यांनी कळवले आहे.

————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button