शेवगाव तालुक्यात निळकंठ कराड यांनी सामन्यांना न्याय देण्याचे काम केले – कॉ.संजय नांगरे

शहाराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी
तीन दशकाहून अधिक काळ शेवगाव तालुक्यातील विविध प्रश्नावर सातत्याने लिखाण करून विविध प्रश्न शासन दरबारी मांडून सामान्य नागरिकांपासून प्रशासनातील अधिकाऱ्यापर्यंत सर्वांनाच न्याय देण्याचे काम केल्यामुळे निळकंठ उर्फ गणपत कराड यांची पत्रकारिता तालुक्याच्या स्मरणात राहील असे मत भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य कौन्सिलचे कॉ. संजय नांगरे मांडले
शेवगाव तालुक्यातील भातकुडगाव फाटा येथे कामधेनु पतसंस्थेच्या सभागृहात आयोजित शोक सभेत नांगरे बोलत होते. निळकंठ कराड राज्य पातळीवर पत्रकारांचे प्रतिनिधित्व करत होते. सर्व पत्रकारांना सोबत घेऊन चालणारे पत्रकारांच्या प्रश्नावर सातत्याने प्रकर्षाने आपले विचार मांडत निर्भीड पत्रकारिता करत असताना कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता तालुक्यातील अनेक प्रश्नावर त्यांनी लिखाण करून न्याय मिळवून दिला त्यांच्या अकाली जाण्याने तालुक्यातील पत्रकार क्षेत्रातील अभ्यासू पत्रकार आपण गमावला आहे. अशी भावना त्यांनी व्यक्त केली. यावेळी कामधेनु पतसंस्थेचे चेअरमन बाळासाहेब काळे, शेतकरी बचाव जन आंदोलनाचे अध्यक्ष एकनाथ काळे, भातकुडगावचे माजी सरपंच शंकरराव नारळकर,ज्येष्ठ पत्रकार आर आर माने, बाळासाहेब जाधव, रवींद्र उगलमुगले, राजेंद्र पानकर,रवींद्र मडके, नानासाहेब चेडे, रावसाहेब मरकड,शहाराम आगळे,अजय माने,रामचंद्र गिरम भारतीय सैन्य दलातील रमेश नरवडे, मारुती सामृत,शेषराव आपशेटे यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.
शेवगाव तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार निळकंठ उर्फ गणपत कराड यांची पत्रकारिता तालुक्यातील सर्वांनाच प्रेरणा देणारी होती.शहरी व ग्रामीण भागातील प्रश्नांची जाण असणारे पत्रकार म्हणून नेहमीच त्यांच्या लिखाणातून जाणवत असे त्यांची निर्भीड पत्रकारिता ही शेवगाव तालुक्यातील यापुढील पत्रकारांसाठी प्रेरणादायी पत्रकारिता ठरणार आहे.
बाळासाहेब जाधव
जलभूमी फाउंडेशन शेवगाव
- तीन दशकांपेक्षा अधिक काळ शेवगाव तालुक्यातील पत्रकार क्षेत्रात अभिराज्य गाजवणारे निळकंठ कराड यांच्या अकाली जाण्याने पत्रकार क्षेत्रात मोठी हानी झाली. सामान्य नागरिकांपर्यंत जाऊन प्रश्नांची उकल करण व पाठपुरावा करून तो प्रश्न धसास लावणे यामध्ये कुठलीही तडजोड न करणारे पत्रकार म्हणून ते पत्रकार बरोबरच सामान्य नागरिकांच्याही आठवणीत राहतील.
- आर आर माने
- ज्येष्ठ पत्रकार भातकुडगाव