समशेरपुर ग्रामपंचायत मार्फत परिसरातील जिल्हा परिषद शाळांना इंटरेक्टीव्ह(75″) बोर्डाचे वाटप!

अकोले प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील समशेरपुर ग्रामपंचायती ने समशेपुर ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या सहा जिल्हा परिषद शाळांना पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून इंटरेक्टीव्ह(75″) बोर्डाचे स्वातंत्र्यदिनी वाटप करण्यात आले
समशेरपुर चे सरपंच कॉ. एकनाथ मेंगाळ, अगस्ती कारखान्याचे संचालक सचिन दराडे यांच्या हस्ते उद्घाटन करून लोकार्पण करण्यात आले.
समशेरपुर केंद्र शाळेत आयोजित केलेल्या या कार्यक्रम प्रसंगी माजी सरपंच दत्तु माळी , विष्णु उगले, शंकर चोखंडे, जनाबाई साळवे, रामदास पठारे, मधु सूर्यवंशी, योगेश भरीतकर , अमोल दराडे, ग्रामविकास अधिकारी घिगे, रवींद्र जोरवर, वसिम शेख,शंकर बेणके मुख्याध्यापक दुर्गुडे, ज्येष्ठ शिक्षक पोपट ढोन्नर,शालेय समितीचे अध्यक्ष मार्तंड कदम आदी उपस्थित होते.

सध्या जगामध्ये डिजिटल युगाचा जमाना आहे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना डिजिटल जगाची ओळख व्हावी आणि त्या माध्यमातून ग्रामीण भागातील तसेच आदिवासी विद्यार्थ्यांना याचा जास्तीत जास्त फायदा व्हावा. यासाठी ग्रामपंचायतच्या माध्यमातून सतत प्रयत्न करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या सर्व जिल्हा परिषद शाळांना एकुण सात इंटरेक्टीव बोर्डाची गरज ओळखून ग्रामपंचायतच्या वतीने निधी ची तरतूद करण्यात आली होती. यातूनच आज सदर इंटरनेट बोर्डाचे सर्व शाळांना लोकार्पण करण्यात आले. सदर इंटरनेट बोर्डमुळे सर्व शिक्षक,पालक आणि विद्यार्थी आनंदित झाल्याचे दिसून आले