पाथर्डी तालुक्यातील दगडवाडी येथे राष्ट्रसंत तनपुरे बाबा यांचा जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रम

पाथर्डी प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेत्र दगडवाडी येथे राष्ट्रसंत तनपुरे बाबा यांच्या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त शनिवार दिनांक 3 डिसेंबर पासून ५ डिसेंबर पर्यंत विविध धार्मिक सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे
बाबांचे हे अमृत महोत्सवी वर्ष असून या निमित्ताने शनिवारी चार वाजता आमदार प्राजक तनपुरे यांच्या हस्ते या जन्मोत्सव सोहळ्याचे उद्घाटन होईल कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पद्मश्री पोपटराव पवार राहणार आहेत प्रमुख मान्यवर म्हणून अमोल महाराज जाधव, अक्षय कर्डिले ,माजी सभापती गोकुळ दौंड उपस्थित राहतील सायंकाळी पाच वाजता राष्ट्रीय संत बद्रीनाथ महाराज तनपुरे यांच्या हस्ते व रफिक सय्यद यांच्या अध्यक्षतेखाली सर्व धर्म सदभावना संमेलन संपन्न होणार आहे यावेळी कुंदन ऋषीजी महाराज मौलाना नदीम सिद्धकी भिकू प्राशिल ,पोलीस अधीक्षक मनोज पाटील ,कुलगुरू डॉ. सर्जेराव निमसे ,अजय महाराज बारस्कर, फादर ब्रिस्टन ब्रिनटो, भाईग्यानी पद्मसिंह जी खालसा, यांच्यासह विविध धर्मातील प्रमुख व्यक्ती यावेळी उपस्थित राहणार आहेत
सायंकाळी सात वाजता वैष्णवी महाराज मुखेकर यांचे कीर्तन होईल रविवारी दुपारी बारा वाजता समुहिक भजन सायंकाळी सहा वाजता विश्व एकात्मता दिंडी सोहळ्यासह गावातील भव्य प्रतिमा मिरवणूक काढण्यात येणार आहे यावेळी मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शहराचे आयोजन करण्यात आले आहे आदर्श गोशाळा चालक म्हणून मिरी येथील शिवाजी वेताळ यांचा सन्मान केला जाईल रात्री अक्षय महाराज उगले यांचे कीर्तन होईल सोमवारी सकाळी 11 वाजता राष्ट्रीय संत बद्रीनाथ महाराज तनपुरे यांचे काल्याचे किर्तन होईल यानंतर रुक्मिणी माता तनपुरे दगडाबाई शिदोरे यांच्या स्मरणात आमदार मोनिका राजळे यांच्या हस्ते 101 महिलांना वस्त्रदान केले जाणार आहे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील राहणार आहेत